Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकखडकवासला जलाशय रक्षणासाठी 'हिंदु जनजागृती समिती' सज्ज; अभियानाचे यंदा २४ वे वर्ष!...

खडकवासला जलाशय रक्षणासाठी ‘हिंदु जनजागृती समिती’ सज्ज; अभियानाचे यंदा २४ वे वर्ष! जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन तसेच खडकवासला पाटबंधारे विभागाचे मोहिमेस सहकार्याचे आश्वासन !

पुणे – धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून खडकवासला जलाशयात आंघोळीसाठी येणे हा प्रकार पर्यावरणाला हानीकारक आहे. संपूर्ण पुणे शहराला पाणीपुरवठा करणारा जलस्रोत प्रदूषित होऊ नये, याचे भान रंग खेळणाऱ्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे आनंदाने सण साजरे करतांना सर्वांनी सण-उत्सवांमध्ये शिरलेल्या अपप्रकारांना थांबवणेही आवश्यक आहे. यासाठी पुणे येथे गेली 23 वर्षे सातत्याने आणि यशस्वपीपणे चालू असलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ यंदाच्या वर्षीही सर्वांच्या सहभागाने राबवण्यात येणार आहे, असे श्री.पराग गोखले यांनी सांगितले.
    खडकवासला जलाशय रक्षण अभियानाचे यंदाचे हे 24 वे वर्ष असून 3 मार्च (धूलिवंदन) आणि 8 मार्च (रंगपंचमी) या दोन्‍ही दिवशी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.30 पर्यंत खडकवासला जलाशयाच्‍या भोवती मानवी साखळी करून हातात प्रबोधनात्मक फलक घेऊन जलाशयाचे रक्षण करण्‍यासाठी प्रबोधन करणार आहेत. हिंदु जनजागृती समितीने आरंभ केलेला हा उपक्रम अन्य समविचारी संघटना, खडकवासला ग्रामस्‍थ, स्थानिक प्रशासन, पाटबंधारे खाते आणि पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने 100 टक्के यशस्वीपणे पार पडत आहे.
 या संदर्भात हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेला निवेदन देण्यात आले. यामध्ये मा. जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे), मा. तहसीलदार कार्यालय (हवेली), मा. सहाय्यक पोलीस उपायुक्त (विशेष शाखा, पुणे शहर), मा. पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण), मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक (नांदेड सिटी पोलीस ठाणे, सिंहगड रस्ता) आणि मा. कार्यकारी अभियंता (खडकवासला पाटबंधारे विभाग) या सर्व संबंधित विभागांना निवेदन देण्यात आले आहे. या अभियानात निश्चित सहकार्य करू असे त्यांनी सांगितले.
     या अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी, तसेच अन्य माहितीसाठी (89833 35517) या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन श्री.पराग गोखले यांनी केले आहे.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!