Homeमुळशीकोळवण ते पौड मार्गावर मोफत बससेवा सुरू

कोळवण ते पौड मार्गावर मोफत बससेवा सुरू

कोळवण ते पौड मार्गावर मोफत बससेवा सुरू : आमदार शंकर मांडेकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना व नागरिकांना दिलासा

मुळशी (पौड दि.19) : चाले (ता. मुळशी) येथील पुलाचे काम सुरू असतानाच सुरु झालेल्या पावसामुळे तयार केलेला पर्यायी मार्ग पाण्याखाली गेला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोळवण खोऱ्यातील १६ गावांचा पौडशी संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर मांडेकर यांच्या पुढाकाराने कोळवण ते पौड या मार्गावर मोफत बससेवा सुरू करण्यात आली आहे.

वाहतूक बंद झाल्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. परिणामी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्येकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख अंकुश मोरे, माजी जि.प. सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती रवींद्र कंधारे, महादेव दुडे, बबन धिडे व यशवंत गायकवाड यांनी लक्ष वेधले. त्यानंतर आमदार मांडेकर यांनी तत्काळ हस्तक्षेप करत बुधवारपासून (ता. १८) मोफत बससेवेचा शुभारंभ केला.

ही बससेवा नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. बस प्रवासासाठी ९९२२४६६१७१ आणि ९८२२४४६१७१ (सचिन भरम) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बस सेवा वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

➤ सकाळी ६.३० वा. – कोळवण-चाले-हनुमान चौक-घोटावडे फाटा-पौड एस.टी. स्टँड

➤ दुपारी १२ वा. – पौड-घोटावडे फाटा-हनुमान चौक-घोटावडेगाव-चाले-कोळवण

➤ दुपारी ४.३० वा. – कोळवण-चाले-घोटावडेगाव-हनुमान चौक-घोटावडे फाटा-पौड एस.टी. स्टँड

➤ सायंकाळी ६ वा. – पौड-दारवलीगाव-भरेफाटा-हनुमान चौक-घोटावडेगाव-चाले-कोळवण

चाले पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत ही मोफत सेवा सुरू राहणार असून, कोळवण खोऱ्यातील विद्यार्थी, नागरिक आणि कामगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार शंकर मांडेकर यांनी केले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!