महाराष्ट्रामध्ये सुमारे एक कोटी आणि पुण्यामध्ये नऊ लाख संख्या असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या असंख्य समस्या आहेत. ज्येष्ठांच्या या समस्या संबंधित खात्यांचे मंत्री आणि अधिकारी यांच्यासमोर मांडण्यासाठी मांडके ह्युमन हॅपिनेस फाउंडेशन आणि पुणे जिल्हा मध्यव
?
यावेळी फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे, लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ, पुणेचे अध्यक्ष बंडोपंत फडके, कर्वे समाज शिक्षण संस्था, पुणेचे संचालक डॉ. महेश ठाकुर आणि ॲस्कॉपच्या सचिव उर्मिला शेजवलकर आदी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय महामेळाव्याचे अध्यक्षस्थान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार भूषविणार असून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
पुण्यातील ज्येष्ठांच्या समस्यांबाबत संयोजकांतर्फे एक सर्वेक्षण घेण्यात आले होते. त्या अभ्यासातून प्रतीबिंबीत झालेल्या सामाजिक आणि सार्वजनिक समस्यांचा अभ्यास करुन त्याची मांडणी या महामेळाव्यात करण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या समस्यांबाबत देखील निवेदन करण्यात येणार आहे. यावेळी फेस्कॉम संघटनेतर्फे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर प्रकाश झोत टाकण्यात येणार आहे. लोकमान्य ज्येष्ठ नागरिक संघ व ॲस्कॉप यांनी केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांचा अहवाल कर्वे समाज शिक्षण संस्थेने तयार केला असून तो यावेळी मांडण्यात येणार आहे. या मेळाव्यात ज्येष्ठांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.





























