स्वदेशी विचारांचा प्रसार, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य आणि शिष्टाचार व पर्यावरण संरक्षण या पाच सूत्रांचा म्हणजे पंच परिवर्तनाची भविष्यातील राष्ट्राच्या पुनरुत्थानाच्या दिशेने निर्णायक पावले असतील. परम वैभव संपन्न राष्ट्र बनण्याचा मार्ग पंच परिवर्तन
?
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास तसेच व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण विभागांतर्गत स्थानिक स्वातंत्र्य सेनानी यू तिरोत सिंग सियम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ३५२ वा शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ऑनलाइन (आभासी) पद्धतीने उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाला राज्य सचिव मनीषा वर्मा यांनी सुद्धा ऑनलाइन मार्गदर्शन केले.
या वेळी प्राचार्य राजेश शेगोकार, गजानन देशमुख, आयएमसी सदस्य गौरव पांडे, विनायक चव्हाण तसेच मुकेश नळकांडे, एनआरबी वाळूजचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान आयएमसी सदस्य जयेश महानकर यांनी शिवचरित्राची माहिती विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजनही केले होते. तसेच आयटीआयचे माजी विद्यार्थी यांची महापारेषण विद्युत कंपनीत सहायकपदी निवड झालेल्या साक्षी विवळे, दिव्यांनी भगत, अंकुश आसलकर, सुमित शेरेकर, अब्दुल नासिम यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर. टी. शेगोकार यांनी केले. सूत्रसंचालन अपर्णा मुळे यांनी केले, तर आभार तुळशीदास राऊत यांनी मानले.





























