सरकारने शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाची भूलथाप दिली असल्याची गंभीर टीका शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. वैजापूर विधानसभा मतदारसंघातील वाहेगाव येथील गावकऱ्यांशी आज ८ जून रोजी अंबादास दानवे यांनी संवाद साधला.
?
वृद्धांना 2100 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन हवेतच विरले. हमीभावाची ‘दीडपट’ भूलथाप ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहे. उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे असल्याची भूमिका अंबादास दानवे यावेळी मांडली.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अंकुश सुंभ, तालुकाप्रमुख सुभाष कानडे, युवासेना जिल्हा युवाधिकारी विठ्ठल डमाळे पाटील, उपतालुकाप्रमुख नागेश चौधरी, बाबासाहेब गव्हाणे,ऋषिकेश मनाळ, विभागप्रमुख पांडुरंग कापे, महेश लिंगायत, अरुण शेलार, बाळू बडक, कल्याणराव मनाळ, युवासेना तालुकाधिकारी अमोल चव्हाण, भाऊसाहेब अमराव, शाखाप्रमुख कृष्णा हिवाळे, पद्माकर मनाळ, संजय पगारे, संपत मनाळ, अनिल पारखे, दौलत मनाळ, बंडू टगरे, अभिषेक मनाळ, रामचंद्र हिवाळे, दत्तू मनाळ, दादासाहेब पतंगे व गणेश हिवाळे उपस्थित होते.
मराठवाड्यातील 72 तालुक्यांमध्ये आंदोलन
महायुती सरकारने शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन मत मिळवली असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मराठवाड्यात आंदोलन करण्यात येत आहे. क्या हुआ तेरा वादा? असे या आंदोलनाचे शीर्षक असून याद्वारे सरकारला जाब विचारत आहे. 5 जून पासून या आंदोलनाला सुरुवात झाली असून 12 जूनपर्यंत मराठवाड्यातील 72 तालुक्यांमध्ये हे आंदोलन होत असून आंदोलक शिवसैनिकांच्या वतीने शेतकऱ्यांचे प्रश्न, अपूर्ण योजना, अनुदान वितरणातील अन्याय, पीकविम्याची स्थिती यावर आवाज उठवला जात आहे.





























