Homeपुणे / पिंपरी-चिंचवडविराट कोहली टीझिंग केएल राहुल हे आरसीबीने डीसी व्हिडिओ व्हायरल आयपीएल 2025...

विराट कोहली टीझिंग केएल राहुल हे आरसीबीने डीसी व्हिडिओ व्हायरल आयपीएल 2025 वर विजय मिळविल्यानंतर माझा ग्राउंड सेलिब्रेशन आहे


विराट कोहली हे केएल राहुल आयपीएल 2025 व्हिडिओसमोर माझा ग्राउंड सेलिब्रेशन आहे: आरसीबीने दिल्लीच्या घरच्या मैदानावरच त्यांचा ६ विकेट्स आणि ८ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. दिल्लीच्या फलंदाजीसाठी खडतर खेळपट्टीवर आणि दिल्लीच्या उत्कृष्ट गोलंदाजी युनिटसमोर विराट आणि कृणाल पंड्याने ११९ धावांची भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीने दिल्लीकडून मागील सामन्यातील पराभवाचा मोठा बदला घेतला आहे. या विजयानंतर विराट कोहलीने केएल राहुलच्या ‘हे माझं होम ग्राऊंड आहे’ या सेलिब्रेशनची नक्कल केली आहे. ज्याचा व्हीडिओ आता व्हायरल होत आहे.

चिन्नास्वामीच्या मैदानावर १० एप्रिलला झालेल्या त्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा घरच्या मैदानावर पराभव केला होता. आरसीबीने दिल्लीला विजयासाठी १६४ धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्लीने सुरूवातीचे ३ विकेट्स गमावल्यानंतर केएल राहुलच्या ५३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या ९३ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर गाठलं होतं. दिल्लीने १७.५ षटकांत हे लक्ष्य गाठत आरसीबीचा मानहानीकारक पराभव केला होता.

दिल्लीच्या त्या सामन्यातील विजयाचा हिरो ठरलेला केएल राहुल हा मूळचा बंगळुरूचा आहे आणि चिन्नास्वामी स्टेडियम हे त्याचं होम ग्राऊंड आहे. राहुलने त्या सामन्यात १५व्या षटकात गियर बदलत तुफान फटकेबाजी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर केएल राहुलने मैदानावर बॅट उभी आपटत कांतारा स्टाईल सेलिब्रेशन करत हे माझं ग्राऊंड आहे म्हटलं होतं. त्याच्या या सेलिब्रेशनचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

हेही वाचा

विराट कोहलीने राहुलच्या This Is My Ground सेलिब्रेशनची केली नक्कल

विराट कोहलीने आता राहुलच्या या सेलिब्रेशनची नक्कल केली आहे. केएल राहुल सामन्यानंतर देवदत्त पडिक्कल, करूण नायर यांच्याबरोबर बोलत होता. तितक्यात मधून विराट कोहली आला आणि त्याने कांतारा स्टाईल सेलिब्रेशन केलं. राहुलने पहिल्या वेळेस पाहिलं नाही म्हणून विराटने परत सेलिब्रेशनची नक्कल केली, राहुलही ते पाहून हसू लागला आणि विराटने हसत हसत त्याला मिठी मारली. विराट आणि राहुलचा हा मजा मस्करी करतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा

विराट कोहलीच्या या नक्कलनंतर चाहते व्हीडिओ फोटो शेअर करत विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही जण म्हणत आहेत की विराट कोहली कधीच काही विसरत नाही आणि विजयानंतर त्याने हे सेलिब्रेशन करत बदला घेतला आहे. तर काही जण विराटच्या अॅक्टिंगचं कौतुक करत आहेत. तर काही चाहते विराट आणि राहुलच्या बॉन्डिंगबद्दल प्रशंसा करत आहेत.

हेही वाचा

आरसीबीने यंदाच्या मोसमातील प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावरील सर्व सहा सामने जिंकले आहेत. तर आतापर्यंत आरसीबीने १० पैकी सात सामने जिंकत सर्वाधिक १४ गुणांसह संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहे. तर दिल्लीचा संघ चौथ्या स्थानी आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!