Homeमहाराष्ट्र'नरेंद्र मोदींच्या परवानगीने मीच बंदूक घेऊन...' पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर संतापलेल्या अभिजित बिचुकलेंचे...

‘नरेंद्र मोदींच्या परवानगीने मीच बंदूक घेऊन…’ पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर संतापलेल्या अभिजित बिचुकलेंचे थेट आव्हान!


पहलगम दहशतवादी हल्ला: काश्मिरच्या पहलगाममध्ये मंगळवारी हृदय पिळवून टाकणारी घटना घडली. या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय.. काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत त्यांच्या जीव घेतला. धर्म विचारत दहशतवाद्यांनी गोळी घातल्याच्या मुद्द्यावरुन आता चांगलंच राजकारण पेटलंय. असे असताना अभिनेते अभिजित बिचुकले यांनी यासंदर्भात महत्वाचे विधान केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर द्याव असं मत अभिजीत बिचकुले यांनी व्यक्त केलंय. पंतप्रधानांच्या परवानगीने मीच दहशतवाद्यांना गोळ्या घालेल असेही ते म्हणाले. काय म्हणाले बिचुकले? सविस्तर जाणून घेऊया.

आपण सर्वप्रथम भारतीय होतो आहोत आणि राहू. आपल्या भारतीयांवर जो हल्ला झाला त्याला इट का जवाब पत्थरने असेच उत्तर द्यायला हवे. दहशतवाद्यांना जात धर्म नसतो. कुठल्याही देशातले दहशतवादी असोत, ते **** असतात, असे बिचुकले म्हणाले.

मागे एकदा पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचा नारा देण्यात आला होता. त्यावेळी त्यांना उचला आणि पाकिस्तानात नेऊन ठेवा, हे बोलणारा मी एकटा होतो. आमचे जाती, धर्म एक असले तरी आम्ही सर्व भारतीय आहोत. भारतीय आमची संस्कृती आहे.  पाकिस्त्यांन्यांनी माझ्या देशावर डोळा ठेवू नये. पाकिस्तान्याचे कोणतेही गालबोट मी लागू देणार नाही. कारण मी छत्रपती शिवरायांचा वैचारिक वारसा संभाळतो,असेही ते पुढे म्हणाले.

या माझ्याशी लढा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची परवानगी घेऊन मीच हातात बंदूक घेतो. तुमचा शिरच्छेद करतो, छातीत गोळ्या घालतो, असे आव्हान त्यांनी यावेळी दहशतवाद्यांना दिले.

https://www.youtube.com/watch?v=g4bcxjHzwzo

राजकारण तापलं

भ्याड हल्ल्याचं कोणतंही राजकारण करु नये असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. तसंच मोदी आणि शाह दहशतवाद्यांना धडा शिकवणार असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदेंनी केलाय. तर शाह शिंदेच्या पक्षाचे प्रमुख असून त्यांनी शाहांचा राजीनामा मागवा असं आव्हान राऊतांनी शिंदेंना केलंय. राज ठाकरेंनी देखील पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचं आव्हान केलंय.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मनसे तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना मनसेकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अतिशय गंभीर आहे. या प्रसंगात सरकारच्या पाठिशी मनसे पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमचं संपवेल अशी अपेक्षा.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गुगलने अमेरिकेत सर्च एजंट सादर केला:पार्श्वभूमीवर 24 तास एआय काम करेल; अपडेट्सवर त्वरित अलर्ट...

0
25 वर्षांपासून इंटरनेटवर काहीही शोधण्याची पद्धत जवळपास सारखीच राहिली आहे. जेव्हाही कोणत्याही प्रोडक्टची, फ्लाइट तिकिटाची किंवा एखाद्या बातमीची माहिती हवी असते, तेव्हा आपल्याला...

राहुल गांधींचे नेतृत्व वारसाहक्काने नव्हे, संघर्षातून उभे राहिले:काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांचे प्रतिपादन

0
काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे नेतृत्व केवळ वारसाहक्काने नव्हे, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील संघर्ष आणि त्यागातून उभे राहिले आहे....

हरिद्वारमध्ये विराजमान झाले 5210 किलोचे पारदेश्वर महादेव:आयोजक म्हणाले- जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग; प्राणप्रतिष्ठेसाठी...

0
हरिद्वारमध्ये ‘पारदेश्वर महादेव’ यांच्या प्राणप्रतिष्ठेसोबत ५२१० किलो वजनाचे पारद शिवलिंग स्थापित करण्यात आले. आयोजकांनी याला जगातील सर्वात मोठे पारद शिवलिंग असल्याचे सांगितले आहे....

TMC नेते जहांगीर खान यांच्या पत्नीला अटक:समर्थकांसह फालता पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचा आरोप, प्रकरणाचा...

0
पश्चिम बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेस (TMC) नेते जहांगीर खान यांची पत्नी शारिका बीबी (37) हिला शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. तिला दक्षिण 24...
spot_img

गुगलने अमेरिकेत सर्च एजंट सादर केला:पार्श्वभूमीवर 24 तास एआय काम करेल; अपडेट्सवर त्वरित अलर्ट...

0
25 वर्षांपासून इंटरनेटवर काहीही शोधण्याची पद्धत जवळपास सारखीच राहिली आहे. जेव्हाही कोणत्याही प्रोडक्टची, फ्लाइट तिकिटाची किंवा एखाद्या बातमीची माहिती हवी असते, तेव्हा आपल्याला...

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...
error: Content is protected !!