Homeमहाराष्ट्रपहलगम दहशतवादी हल्ला कॉंग्रेसचे आमदार विजय वाडेटीवार प्रश्न सुरक्षा व्यवस्था बुद्धिमत्ता अपयश

पहलगम दहशतवादी हल्ला कॉंग्रेसचे आमदार विजय वाडेटीवार प्रश्न सुरक्षा व्यवस्था बुद्धिमत्ता अपयश

महाराष्ट्र: पहलगम दहशतवादी हल्ल्यावरील विजय वाडेटीवार: आम्ही हल्ल्याचा निषेध करतो. हा भारत देशावरचा हल्ला आहे, असं प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी नोंदवली आहे. इथे राजकारणचा विषय नाही. पण हा हल्ला म्हणजे इंटेलिजन्सचे अपयश आहे, असंही वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे. “दहशतवाद्यांना रान मोकळे केले असा हा सगळा प्रकार आहे. इंटेलिजन्स काय करत होते? हजारो पर्यटक जिथं होते मग तिथं एकही पोलीस किंवा सुरक्षा रक्षक कसा काय नव्हता?” असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.

…पण दहशतवाद संपला नाही

“सुरक्षेसंदर्भातील व्यवस्था करणे गरजेच होते. ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी टार्गेट करून गोळीबार केला ते भयानक आहे,” असं मत वड्डेटीवार यांनी व्यक्त केलं आहे. “जम्मू-काश्मीरमधून हिंदूंचे पलायन होत आहे मग नोटबंदी झाली आणि बोलले जात होते की दहशतवाद संपेल पण संपला नाही. हे सरकारचे अपयश आहे,” असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

प्रवाशांना सुरक्षितपणे काढा

वड्डेटीवार यांनी या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेलेल्या प्रवाशांना सुरक्षितपणे तिथून काढले पाहिजे, असं म्हटलं आहे. मोठ्या संख्येने पर्यटक जात असतात तिथे सुरक्षा बंदोबस्त असायला हवा, अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली आहे. तसेच वडेट्टीवार यांनी, “दोन धर्मांना एकमेकांसमोर उभे करण्याचा हा डाव असू शकतो,” अशी शक्यताही व्यक्त केली आहे.

राहुल गांधी दौरा अर्धवट सोडून परतणार

लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. सध्या अमेरिकेत असलेल्या राहुल गांधींनी आपला दौरा अर्ध्यात रद्द करुन परतणार आहेत. सध्या ते या हल्ल्यासंदर्भात केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईत भाजप करणार निषेध

मुंबई उपनगरसह पालकमंत्री मंगल प्रभात लोढांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई भाजपा काश्मीरच्या पहेलगाममधील घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करणार आहे. आज सायंकाळी आठ वाजता गिरगाव चौपाटी येथे निषेध आंदोलन केलं जाणार आहे. या भ्याड हल्ल्याविरोधात शहीद तुकाराम ओंबळे चौकात आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाने केलं आहे. सौ.झी.न्यूज.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC नेते जहांगीर खान यांच्या पत्नीला अटक:समर्थकांसह फालता पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याचा आरोप, प्रकरणाचा...

0
पश्चिम बंगाल पोलिसांनी तृणमूल काँग्रेस (TMC) नेते जहांगीर खान यांची पत्नी शारिका बीबी (37) हिला शुक्रवारी सकाळी अटक केली आहे. तिला दक्षिण 24...

आज मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल:मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी सतर्क राहावे, मंगळ...

0
आज (20 जून) रात्री मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. मंगळ 2 ऑगस्टपर्यंत वृषभ राशीतच राहील. मंगळाच्या या राशी बदलामुळे मिथुन, तूळ आणि कुंभ...

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज अंतिम फैसला:पक्षांतराच्या चर्चेमुळे ओमराजेंच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त

0
नवी मुंबईच्या कळंबोलीत 2006 मध्ये भरदिवसा झालेल्या पवनराजे निंबाळकर यांच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेला आज दोन दशके पूर्ण झाल्यानंतर,...
spot_img

स्वीडन वि नेदरलँड आणि जर्मनी वि आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकन

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: स्वीडन विरुद्ध नेदरलँड आणि जर्मनी विरुद्ध आयव्हरी कोस्ट सामन्याचे पूर्वावलोकनक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...
error: Content is protected !!