Homeमहाराष्ट्रडॉ. वालसंगकर सोलापूर मृत्यू प्रकरण मनीषा माने वकिलांनी डॉक्टरांच्या कुटुंबाबद्दल दावा केला

डॉ. वालसंगकर सोलापूर मृत्यू प्रकरण मनीषा माने वकिलांनी डॉक्टरांच्या कुटुंबाबद्दल दावा केला


डॉ. वालसंगकर मृत्यू प्रकरण: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणामध्ये मनीषा माने या महिलेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तथा न्याय दंडाधिकारी दीपक कंखरे यांनी मनीषा माने यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी मनीषा माने ही डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होती. तिला कामावरून काढल्याने आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना स्वतः आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता मनीषा मानेचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

एफआयआरमध्ये काय म्हटलं आहे?

मनीषा माने या 2008 पासून वळसंगकर हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. सध्या त्या एओ म्हणजेच विशेष अधिकारी म्हणून काम करत होत्या. 17 एप्रिल रोजी मनीषा यांनी डॉ.वळसंगकर यांना तुमच्या हॉस्पिटलमध्ये पगार कपात होत आहे असा एक मेल पाठवल्याचं सांगितलं जात आहे. माझ्याबद्दल काही वाईट सांगितले जात आहे. माझ्यावर आरोप होत आहेत. माझी बदनामी होत आहे. ते कमी व्हावेत नाहीतर मी आत्महत्या करते, असा मेल त्यांनी डॉक्टरांना पाठवला होता. 17 तारखेला मेल पाठवल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलला बोलवून घेतले. तेव्हा या महिलेने डॉक्टरांची माफी मागितली होती. माफी मागितल्यानंतर डॉक्टरांनी संध्याकाळी घरी जाऊन रिवाल्वर मधून गोळ्या घालून आत्महत्या केली, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. आत्महत्येपूर्वी डॉ. शिरीष वळसंगकरांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. हस्ताक्षर नमुने घेऊन ते तपासायला पाठवायचे असल्याचं पोलिसांनी कोर्टासमोर या चिठ्ठीबद्दल बोलताना सांगितलं.

मनीषा मनेच्या वकिलांचं म्हणणं काय?

डॉ. शिरीष वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणातील वस्तुस्थिती वेगळी आहे, असं ॲड. प्रशांत नवगिरे यांनी म्हटलं आहे. मनीषा माने यांच्यावर खोटी केस करण्यात आल्याचा मानेंच्या वकिलांचं म्हणणं आहे. “प्रख्यात मेंदूरोग तज्ञ असणारे डॉक्टर अशा किरकोळ कारणामुळे आत्महत्या करणे शक्य नाही. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून. हे बाहेर येऊ नये यासाठी खोटी केस मनीषा माने यांच्यावर करण्यात आली आहे,” असा युक्तिवाद आम्ही मांडल्याचं मनीषा मानेचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी सांगितलं. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. “जेव्हा कोठडी संपेल तेव्हा आम्ही जामिनासाठी अर्ज करू,” असंही ॲड. प्रशांत नवगिरे म्हणाले. “मनीषा माने यांच्यावर एकही गैरव्यवहाराचा आरोप नाही,” याकडेही ॲड. प्रशांत नवगिरे यांनी लक्ष वेधलं आहे. “मनीषा यांच्यावर आरोप एवढाच आहे की त्यांनी डॉक्टरांना मेल केला होता. या मेलमध्ये त्यांनी डॉक्टरांना माझी पगारकपात करू नका मी फार जुनी कर्मचारी आहे, असं म्हटल्याचं  ॲड. प्रशांत नवगिरे म्हणाले.

डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत

मेल प्रकरणानंतर डॉ. शिरीष वळसंगकरांनी मनीषा यांना रुग्णालयात बोलावून माफी मागून घेतली. कर्मचाऱ्यावर विश्वास आहे म्हणून त्यांना बोलवून घेतलं. ती दुष्ट असतील तर तिला बोलून घेण्यात आलं नसतं. एक दिवसाची पगार कपात केली एवढाच विषय असल्याचं ॲड. प्रशांत नवगिरे म्हणाले.  “माझ्या आशिलाद्वारे मला हीच माहिती मिळाली आहे की, मी फक्त मेल केला आहे बाकी कुठेही आर्थिक व्यवहार किंवा डॉक्टरांच्या चारित्र्यावर आरोप केलेले नाहीत. मी हा असा मेल पाठवल्याने डॉक्टर व्यथीत झाले होते, असं मनीषा यांनी म्हटलंय,” असंही ॲड. प्रशांत नवगिरे यांनी सांगितलं आहे.

मनीषा यांच्या फोनमध्ये ती गुप्त माहिती

तसेच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातीत काही कौटुंबिक वादामधील गोपनीय गोष्टींची माहिती मनिषा यांना होती. त्याबाबतचे काही मेसेस तसेच ऑडिओ क्लिप मनीषा यांच्या मोबाईलमध्ये आहेत स्वत: मनीषा यांनीच ही माहिती मला दिली असल्याचा दावा ॲड. प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे. त्यामुळे ही गोपनीय माहिती नेमकी काय आहे? याबद्दल पुढील सुनावणीमध्ये काही माहिती समोर येते का? या माहितीमुळे डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नृपेंद्र मिश्रा म्हणाले- राम मंदिराच्या देणगीवर दरोडा टाकला गेला:मंदिर विश्वस्तांनी सांगितले- विश्वासघात झाला, संपूर्ण...

0
श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष माजी IAS नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, राम मंदिरात अर्पण चोरीवर उघडपणे दरोडा टाकण्यात आला. मंदिराचे संपूर्ण व्यवस्थापन...

ऑगस्ट 2026 सर्व 12 चिन्हांसाठी राशिचक्र अंदाज

0
15 तासांपूर्वीलिंक कॉपी करा20 जूनच्या रात्रीपासून मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल. या राशीत 2 ऑगस्टपर्यंत राहील. वृषभ शुक्राच्या मालकीची रास आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य...

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...
spot_img

अविष्काच्या शतकामुळे श्रीलंका-ए ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत:अफगाणिस्तानला 103 धावांनी हरवले; 21 जून रोजी भारताशी...

0
अविष्का फर्नांडोच्या शतकामुळे श्रीलंका-ए संघ वनडे ट्राय सिरीजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. संघाने दांबुला येथे अफगाणिस्तान-ए संघाला 103 धावांनी हरवले. 21 जून रोजी...

वर्तमानपत्रात कधीही अन्न गुंडाळू नका:शाईमुळे कर्करोग आणि फूड पॉयझनिंगचा धोका, अन्न पॅकेजिंगचा योग्य आणि...

0
जर तुम्हाला स्ट्रीट फूड आवडत असेल, तर तुम्ही वर्तमानपत्रात गुंडाळलेले समोसे, वडापाव किंवा जिलेबी खाल्लीच असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की खाण्यापिण्याच्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनला न्यायालयाचे समन्स:हजर राहावेच लागेल, चार्जशीटमध्ये आरोपी क्रमांक 11 बनवण्यात...

0
हैदराबादमधील नंपल्ली न्यायालयाने तेलुगु चित्रपट स्टार अल्लू अर्जुनला न्यायालयात वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स जारी केले आहे. ही कायदेशीर कारवाई डिसेंबर 2024 मध्ये त्यांच्या...

आयफोनसह ॲपलची उत्पादने महाग होतील:टिम कुक म्हणाले- चिपच्या कमतरतेमुळे खर्च वाढला, किंमती वाढवणे भाग...

0
टेक कंपनी ॲपल लवकरच आयफोन आणि तिच्या इतर उत्पादनांच्या किमती वाढवू शकते. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या एका...
error: Content is protected !!