Homeपुणे / पिंपरी-चिंचवडसार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते 'मु. पो. तालकटोरा' पुस्तकाचे...

सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ‘मु. पो. तालकटोरा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ९८ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वागताध्यक्ष तथा जेष्ठ नेते शरद पवार व अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांची संमेलनातील भाषणे संग्रही ठेवण्याच्या उद्देशाने जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार संपादित ‘मु. पो. तालकटोरा’ या पुस्तकाचे प्रकाशन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात करण्यात आले.

यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीता पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार श्रीराम पवार, सरहद संस्थेचे संजय नहार आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. भोसले म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अभिमानाची बाब आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मोठे योगदान आहे. यात सातारच्या शाहूपुरी शाखेचा महत्त्वाचा वाटा आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठीच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले आहे असे सांगून सातारा जिल्ह्याची साहित्य व कला क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. नुकतेच साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेच्या प्रयत्नातून बा. सी. मर्ढेकरांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्यात आले असून सुंदर वास्तू उभारण्यात आल्याचे सांगितले.

ते म्हणाले, महाराष्ट्र सदनमध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. दिल्लीतील मराठी माणसांना महाराष्ट्र सदनमध्ये प्रवेश मिळण्यासाठीही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगून ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे घेण्यात यावे, असे ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी दिल्ली येथे २०१८ मध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेले सातारचे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जेष्ठ पत्रकार रविंद बेडकिहाळ, राजन लाके, दैनिक पुढारी प्रमुख हरिष पाटणे, जयेंद्र चव्हाण, अविनाश कदम, फिरोज पठाण, राजेश जोशी, संतोष यादव, गजानन पारखे, शेखर मोरे पाटील, राजू गोरे, अजित साळुंखे, अमर बेंद्रे, रोहित वाकडे, विशाल कदम, अक्षय जाधव, सचिन सावंत, सतीश घोरपडे, सोमनाथ पवार, राजेंद्र जगताप, वैभव पवार, वजीर नदाफ यांचा मंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, श्रीराम पवार यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध माध्यमातून योगदान देणाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांनी तर शैलेश पगारिया यांनी उपस्थितांचे आभार मानले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!