Homeमनोरंजनआपल्याला माहित आहे काय की सोशल मीडिया अचानक स्टुडिओ गिबली स्टाईल एआय...

आपल्याला माहित आहे काय की सोशल मीडिया अचानक स्टुडिओ गिबली स्टाईल एआय आर्टसह का पूर आला आहे?

मनोरंजन : स्टुडिओ गिबली-स्टाईल आर्ट व्हायरल फोटो: विज्ञान आणि तंत्रज्ञान इतक्या झपाट्यानं पुढे जात आहे की प्रत्येक दिवस काहीतरी नवं पाहायला मिळत आहे. सोशल मीडिवर हे बदल अतिशय झपाट्यानं पाहायला मिळत असून, त्यातच आता एक कमाल फिचर सर्वच नेटकरी वापरताना दिसत आहेत. या फिचरची सर्वांनाच भुरळ पडली असून, अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसुद्धा (Sachin Tendulkar) यात मागे राहिले नाहीत.

या कार्टून फोटोंना नेमकं म्हणायचं तरी काय?

व्हायरल होणारे आणि लक्ष वेधणारे हे फोटो OpenAI ची एक नवी अपडेट असून त्याच माध्यमातून हे Ghibli-Style Art फोटो व्हायरल होत आहेत. मंगळवारीच ओपन एआयचं नवं टूल GPT-4o लाँच करण्यात आलं. ज्यानंतर लगेचच जगभरातील नेटकऱ्यांनी त्यांच्या कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड देत जणू एखादं चित्र भासावं अशी कार्टून Ghibli aesthetic मध्ये तयार करून घेतली.

हे नवं मॉडेल एखादा फोटो किंवा एखादं दृश्य अधिक प्रभावी आणि तितक्याच कमालपणे सादर करण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलं आणि हे करत असताना त्यामध्ये जपानी अॅनिमेटर हायाओ मियाझाकी यांच्या कलेची झलकही दिसून येताच नेटकरी हैराण झाले.

ओपन एआयची ही अपडेट Live केल्याच्या काही तासांनंतरच इतकी व्हायरल झाली की सोशल मीडियावर जणू ही लाटच आली. अनेक नेटकऱ्यांनी त्यांचे काही फोटो वापरत या टूलला तपासून पाहिलं आणि समोर आलेलं उत्तर, एक अप्रतिम कार्टून फोटो पाहून प्रत्येकजण भारावला. सेल्फी, प्राण्यांचे फोटो, काल्पनिक दृश्य, मोठे प्रसंग इथपासून अभिनेते, नेते, खेळाडू या साऱ्यांनीच हे कमाल टूल वापरून पाहिलं.

गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर #GhibliStyle आणि #AIGhibli असे हॅशटॅगही ट्रेंड करू लागले आहेत, जिथं पाण्याच्या रंगांचा वापर करून आपण एखादं चित्र रेखाटतो तेव्हा ते नेमकं कसं दिसतं अगदी तसंच दृश्य एका क्षणात हे टूल डोळ्यांसमोर उभं करतं.

कार्टूनच्या विश्वात किंवा एका काल्पनिक जगात जगण्याची सुप्त इच्छा अनेकांचीच असते. या टूलमुळं हीच संधी सर्वांना मिळत असून ते अनोखं विश्व नेमकं कसं असेल आणि तुम्ही तिथं कसे दिसाल याचं कमाल चित्रण या टूलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.

चॅट जिपीटीच्या नव्या अपडेटविषयी थोडं….

ओपन एआयच्या चॅट जिपीटीमध्ये थेट चॅटबॉटमध्येच फोटो एडिट करण्याची मुभा युजर्सना दिली जात आहे. ज्याअंतर्गत “Images in ChatGPT” हे फिचर सर्वांसाठी उपलब्ध असून, हे टूल मोफत वापरणाऱ्यांना मात्र त्याच्या अधिकच्या वापरामुळं काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळं हे टूल नेमकं कसं काम करतं हे पाहण्यासाठी ते प्रत्यक्षात एकदा वापरून पाहाच… सौ.झी.न्यूज

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!