HomeमनोरंजनMotorala ने उडवली samsung ची झोप; खूपच स्वस्तात आणला Stylus Pen सपोर्टवाला...

Motorala ने उडवली samsung ची झोप; खूपच स्वस्तात आणला Stylus Pen सपोर्टवाला फोन!


मोटोरोला एज 60: तुम्ही बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधत असाल तर तुमच्यासाठी ही एक महत्वाची अपडेट आहे. मोटोरोला कंपनी तुमच्यासाठी धमाकेदार स्मार्टफोन घेऊन आलाय. मोटोरोला एज 60 सिरीजमध्ये आणखी एक स्टायलिश स्मार्टफोन भारतात लाँच झालाय. या फोनमध्ये खूप काही खास असणार आहे. त्यामुळे टेक जगतात या स्मार्टफोनची चर्चा आहे. या स्मार्टफोनने सॅमसंगच्या स्मार्टफोनला तगडी स्पर्धा दिलीय. काय आहे यात खास? सविस्तर जाणून घेऊया.

मोटोरोला एज 60 फोनमध्ये स्टायलस पेन सपोर्ट मिळतोय. हे पाहून अनेक यूजर्सना सॅमसंग गॅलेक्सी नोट मालिकेची आठवण येईल. मोटोरोलाचा हा नवीनतम स्मार्टफोन मध्यम बजेट किंमतीच्या श्रेणीत लाँच करण्यात आलाय. फोनमध्ये pOLED डिस्प्ले, 5000mAh बॅटरी, फास्ट चार्जिंगसह अनेक शक्तिशाली फिचर्स देण्यात आले आहेत.

सवलतीत मिळतोय स्मार्टफोन

मोटोरोला एज 60 स्टायलसमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबीच्या सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये देण्यात आलंय. याची किंमत 22 हजार 999 रुपये आहे. हा फोन तुम्हाला  पॅनाटोन सर्ट द वेब (Panatone Surt the Web) आणि पॅनाटोन जिब्राल्टर सी (Panatone Gibraltar Sea) या 2 रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. पहिल्या सेलमध्ये फोन खरेदीवर 1 हजार रुपयांची बँक सवलत दिली जातेय.

मोटोरोला एज 60 स्टायलसची वैशिष्ट्ये

हा मोटोरोला फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 2 प्रोसेसरवर चालतो. या फोनमध्ये 8 जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256 जीबी यूएफएस 2.2 स्टोरेज देण्यात आलंय. हा फोन अँड्रॉइड 15 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. कंपनी या फोनसोबत 2 वर्षांची ओएस आणि तीन वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देतंय. यामध्ये ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

प्रदर्शन

मोटोरोला एज 60 स्टायलसमध्ये 68W यूएसबी टाइप सी फास्ट चार्जिंग फीचरसह 5 हजार एमएएचची शक्तिशाली बॅटरी देण्यात आलीय. या फोनमध्ये 6.67-इंचाचा पॉलईडी 2.5डी डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 2712×1220 पिक्सेल आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 120 हर्ट्झच्या उच्च रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तसेच त्याची कमाल ब्राइटनेस 3 हजार निट्स पर्यंत आहे. याशिवाय डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 300 हर्ट्झ आहे. डिस्प्लेसाठी त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 देण्यात आलाय.

दमदार कॅमरा

या स्मार्टफोनच्या मागील बाजूस व्हेगन लेदर फिनिशिंग देण्यात आलंय. हे फिनिशिंग त्याच्या दोन्ही रंगामध्ये दिसेल. या फोनचे वजन 191 ग्रॅम आहे असून IP68 वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. या फोनमध्ये मिलिटरी ग्रेड MIL-STD-810H प्रोटेक्शन देण्यात आलंय. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. या स्मार्टफोनच्या कॅमेराबद्दल सर्वात जास्त चर्चा होतेय. मोटोरोलाच्या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य OIS कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 3 इन 1 लाईट सेन्सर कॅमेरा देण्यात आलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या मोटोरोला फोनमध्ये 32MP कॅमेरादेखील आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!