Homeमनोरंजन30 वर्षांचा कोथरुड मॅन फ्रॉड मधील एव्हिएटर गेम घोटाळा 39 लाख 77...

30 वर्षांचा कोथरुड मॅन फ्रॉड मधील एव्हिएटर गेम घोटाळा 39 लाख 77 हजारांसाठी


पुणे मध्ये एव्हिएटर गेम घोटाळा: पुण्यात सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोथरूड येथील 30 वर्षीय प्रतीक घुगे या तरुणाने ‘एव्हिएटर’ नावाच्या ऑनलाइन गेमच्या नादात तब्बल 39 लाख 77 हजार रुपये गमावले आहेत. विशेष म्हणजे, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि उद्योगपती अनंत अंबानी यांच्यासारख्या सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ दाखवून तरुणाला या गेममध्ये गुंतविण्यात आले होते. विमान उडवण्याच्या एका विचित्र गेमच्या माध्मयातून या तरुणाला गंडा घालण्यात आला.

एव्हिएटर गेमशी संबंधित ही पुण्यातील पहिलीच मोठी फसवणूक

प्रकरणाची दखल घेत सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. पुण्यात एव्हिएटर गेमशी संबंधित ही पहिलीच मोठी फसवणूक असल्याचे सांगण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅपवर आली गेमसंदर्भातील लिंक

प्रतीक घुगेने दिलेल्या तक्रारीनुसार, 28 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक अनोळखी लिंकसह गेमिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात आली. आकर्षक परताव्याच्या आमिषाने त्यांनी लिंकवर क्लिक करून खाते उघडले. सुरुवातीला त्याने 10 हजार रुपये गुंतवले, परंतु कोणताही नफा मिळाला नाही. त्यानंतर आणखी पैसे गुंतवत त्याने एकूण गुंतवणूक वाढवत नेली.

हळूहळू वाढवत नेली गुंतवणूक

प्रथम गुंतवणुकीनंतर काही अंशी परतावा मिळाल्याने त्याने 5 लाख 86 हजार रुपये गुंतवले, त्यावर फक्त 1 लाख रुपये परत मिळाले. पुन्हा प्रलोभनाच्या नादात, 5 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर 2024 दरम्यान त्याने 8 लाख 30 हजार रुपये गुंतवले, यावर फक्त 2 लाख रुपये परत मिळाले. तरीही आशेवर पाणी न सोडता त्यांनी 12 ते 19 डिसेंबर या आठवड्यात आणखी 12 लाख 83 हजार रुपये गुंतवले.अखेर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि गुंतवलेली रक्कम वाढल्याचे लक्षात आल्यावर, प्रतीकने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

एव्हिएटर गेम म्हणजे काय?

एव्हिएटर हा एक ऑनलाइन बेटिंग गेम आहे. यात स्क्रीनवर विमान उड्डाण करते आणि खेळाडूंना ते गायब होण्यापूर्वी आपली रक्कम काढावी लागते. जितके जास्त वेळ विमान हवेत राहील, तितका गुणक (Multiplier) वाढतो, आणि तितका परतावाही मोठा मिळतो. पण जर विमान गायब होण्याआधी पैसे काढले नाहीत, तर सर्व रक्कम गमवावी लागते. हा गेम मुद्दाम व्यसनाधीन होईल अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामुळे अनेकजण झटपट पैसे कमावण्याच्या आशेने याच्या आहारी जातात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!