Homeमनोरंजनसीएसके आयपीएल 2025 मध्ये रतुराज गायकवाडची जागा घेणार आहेत. दुखापतीमुळे नाकारले गेले

सीएसके आयपीएल 2025 मध्ये रतुराज गायकवाडची जागा घेणार आहेत. दुखापतीमुळे नाकारले गेले

आयपीएल 2025: इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा सीजन चेन्नई सुपरकिंग्ससाठी (Chennai Superkings) खूपच अडथळ्यांचा सुरु आहे. यंदाच्या सीजनमध्ये सीएसकेने एकूण 6 सामने खेळले असून तब्बल 5 सामन्यात त्यांचा दारुण पराभव झालाय. असं असताना कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा सुद्धा दुखापतीच्या कारणामुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा चेन्नई फ्रेंचायझीने कर्णधारपदाची धुरा आता एम एस धोनीच्या खांद्यावर सोपवली आहे. चेन्नई सुपरकिंग्स ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट म्हणून कोणाला संघात आणणार अशी चर्चा सुरु असताना मराठमोळ्या आयुष म्हात्रेचं नाव समोर येत आहे.

ऋतुराज गायकवाडला झाली दुखापत :

चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की ऋतुराज गायकवाडला गुवाहाटीमध्ये दुखापत झाली होती. तो दुखापतीसह खेळत होता. आम्ही त्याचा एक्स-रे काढला, परंतु त्यात सगळं स्पष्ट झालं नाही. मग आम्ही एमआरआय सुद्धा काढला आणि ज्यात समजलं की त्याच्या कोपऱ्यात फ्रॅक्चर आहे. आम्ही खूप निराश झालो, पण त्याने संघासाठी जे प्रयत्न केले त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. आता तो या दुखापतीमुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर होत आहे. आमच्याकडे अनकॅप्ड खेळाडू म्हणून एम एस धोनी आहे जो आयपीएल 2025 मध्ये उर्वरित सामन्यात संघाचं नेतृत्व करेल.

मुंबईच्या क्रिकेटरला मिळणार संधी :

ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट म्हणून मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा आणि भारताचा स्टार क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा सीएसकेमध्ये समावेश होऊ शकतो अशी शक्यता होती. मात्र आता सूत्रांच्या माहितीनुसार 17 वर्षांचा आयुष म्हात्रे हा मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडला रिप्लेस करू शकतो. चेन्नई फ्रेंचायझीने काही दिवसांपूर्वी काही तरुण खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या होत्या, त्यानंतर संघाने मुंबईचा तरुण सलामीवीर फलंदाज म्हात्रेला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळतेय. परंतु अद्याप चेन्नई सुपरकिंग्सकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही, किंवा त्यांनी याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

कोण आहे आयुष म्हात्रे?

युवा क्रिकेटर आयुष म्हात्रे हा मूळचा विरारचा रहिवासी असून तो सध्या 17 वर्षांचा आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये आयुष म्हात्रेने स्वतःला 30 लाखांच्या किंमतीवर लिस्ट केले होते. परंतु त्याला कोणत्याही संघाने खरेदी केली नाही. आयुष म्हात्रेने 9 फस्ट क्लास सामन्यांमध्ये खेळलेल्या 16 डावांत 504 धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेची सर्वोच्च धावसंख्या 176 धावा आहे. आयुष म्हात्रेने यामध्ये 2 शतके आणि 1 अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट ए मध्ये त्याने 7 डावात 458 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने 2 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावले आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!