Homeमनोरंजनपृथ्वी शॉ आयपीएल 2025 सोशल मीडिया अफवांसाठी सीएसकेमध्ये रतुराज गायकवाडची जागा घेऊ...

पृथ्वी शॉ आयपीएल 2025 सोशल मीडिया अफवांसाठी सीएसकेमध्ये रतुराज गायकवाडची जागा घेऊ शकेल

आयपीएल 2025: आयपीएलच्या इतिहासात तब्बल 5 वेळा विजेतेपदावर नाव कोरलेला चेन्नई सुपरकिंग्सचा संघ यंदा आयपीएल 2025 मध्ये सलग 5 वेळा पराभूत झालेला आहे. सध्या संघ संकटात असून दुष्काळात तेरावा महिना म्हणजे चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) हा दुखापतीच्या कारणामुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर पडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा महेंद्र सिंह धोनीकडे (MS Dhoni) सीएसकेचं नेतृत्व आहे. अशातच ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट कोणता खेळाडू असणार याची जोरदार चर्चा सुरु आहे यातील एक नाव हे मुंबईच्या स्टार खेळाडूंचं सुद्धा आहे.

ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त :

चेन्नई सुपरकिंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग याने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की ऋतुराज गायकवाडला गुवाहाटीमध्ये दुखापत झाली होती. तो दुखापतीसह खेळत होता. आम्ही त्याचा एक्स-रे काढला, परंतु त्यात सगळं स्पष्ट झालं नाही. मग आम्ही एमआरआय सुद्धा काढला आणि ज्यात समजलं की त्याच्या कोपऱ्यात फ्रॅक्चर आहे. आम्ही खूप निराश झालो, पण त्याने संघासाठी जे प्रयत्न केले त्याचं आम्हाला खूप कौतुक आहे. आता तो या दुखापतीमुळे संपूर्ण सीजनमधून बाहेर होत आहे. आमच्याकडे अनकॅप्ड खेळाडू म्हणून एम एस धोनी आहे जो आयपीएल 2025 मध्ये उर्वरित सामन्यात संघाचं नेतृत्व करेल.

आयपीएलमध्ये अनसोल्ड खेळाडूला मिळणार संधी?

पृथ्वी शॉ बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. यावर्षी त्याने अद्याप एकही सामना खेळलेला नाही. पृथ्वीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश विरुद्ध मुंबईकडून शेवटचा क्रिकेट सामना खेळला होता. तसेच नोव्हेंबरमध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये पृथ्वी शॉला कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही. त्यामुळे तो अनसोल्ड राहिला. मात्र आता ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्याने पृथ्वीला सीएसकेकडून संधी मिळू शकते. या संदर्भात काही सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत असून यात पृथ्वी शॉ आयपीएल 2025 सुरु असताना ऋतुराजच्या ऐवजी चेन्नई सुपरकिंग्सचा भाग होऊ शकतो असे म्हटले जात आहे. पृथ्वी शॉ यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळलाय. मात्र अद्याप ऋतुराज गायकवाडच्या रिप्लेसमेंटबाबत कोणतीही अधिकृत माहिती सीएसकेने दिलेली नाही.

CSK च्या बॅटिंग लाईनअपला झटका :

ऋतुराज गायकवाड हा कर्णधार असण्यासोबतच सीएसकेचा स्टार फलंदाज सुद्धा होता. मात्र 30 मार्च रोजी राजस्थान विरुद्ध सामन्यात त्याला दुखापत झाली. तुषार देशपांडेने टाकलेला एक बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथपेक्षा जास्त उसळला आणि ऋतुराजच्या डाव्या हाताला लागला. 5 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात ऋतुराज खेळणार की नाही याबाबत संशय होता, परंतु त्याने सामना खेळला, तसेच त्यानंतर मंगळवारी पंजाब किंग्स विरुद्ध सामन्यात सुद्धा त्याने फलंदाजी केली. आता ऋतुराज स्पर्धेतून बाहेर झाल्याने चेन्नई सुपरकिंग्सची बॅटिंग लाईनअप कमजोर होऊ शकते. आता सीएसकेला त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये बदल करावा लागेल.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!