Homeमनोरंजनसायबर क्राइम जागरूकता कॉलर ट्यून गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात मदत तपशील क्रमांक...

सायबर क्राइम जागरूकता कॉलर ट्यून गुन्हेगारीचे प्रमाण कमी करण्यात मदत तपशील क्रमांक पहा


सायबर क्राइम जागरूकता कॉलर ट्यून: मागील चार महिन्यांपासून कोणालाही कॉल केल्यानंतर पहिले काही सेकंद एक ठराविक कॉलर ट्यून सर्वांना ऐकायला मिळते. जनहितार्थ सरसकट ही कॉलर ट्यून वाजवली जात असली तरी आपत्कालीन परिस्थितीत फोन करायचा झाल्यास हे आधी कुठे ऐकत बसायचं असा आक्षेपही अनेकजण घेताना दिसत आहेत. असं असलं तरी या कॉलर ट्यूनचा खरोखरच सकारात्मक परिणाम झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले आहे, तुमच्या बँक खात्यात मनी लॉड्रिंगचे पैसे आले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता डिजिटल अरेस्ट झाल्याचे सांगणारे व्हिडीओ कॉल आल्यास सावध व्हा, अशा कॉलला बळी पडू नका, अशी कॉलर ट्यून केंद्र सरकारनेच सुरू करून सायबर गुन्हेगारीबाबत जनजागृती केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर व डिसेंबर महिन्यात अशा डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यांची संख्या आता फारच कमी झाल्याचं ठाण्यात दिसून येत आहे.

गुन्ह्यांमध्ये मोठी घट

2024 च्या सप्टेंबर ते डिसेबर या चार महिन्याच्या तुलनेत जानेवारी व फेब्रुवारी 2025 या दोन महिन्यांमध्ये डिजिटल अरेस्टच्या भीतीमध्ये व पर्यायाने गुन्ह्यांत घट झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयात डिजिटल अरेस्टसंदर्भातील गुन्ह्यांची सप्टेंबर, डिसेंबरमधील 15 ते 20 ही संख्या जानेवारीमध्ये अवघ्या 4 गुन्ह्यांवर आली असून फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 3 पर्यंत खाली घसरला आहे.

मोहीम सुरू झाली

सायबर गुन्हेगारांनी तुमच्या बँक खात्यातून मनी लाँड्रिंग झाले आहे, अशी भीती घालून डिजिटल अरेस्ट करून कोट्यवधी रुपये हडपण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. खऱ्याखुऱ्या पोलिसांसारखे व न्यायमूर्तीसारखे दिसणारे गुन्हेगार मोबाइलवरील व्हिडीओ कॉलमध्ये पाहून लोक भुलल्यानंतर केंद्र, राज्याने जनजागृतीची मोहीम जानेवारीपासून हाती घेतली. ठाणे आयुक्तालयात सायबर फ्रॉडचे ऑक्टोबरमध्ये 63, नोव्हेंबर 25, डिसेंबरमध्ये 62 गुन्हे, जानेवारीत 49, फेब्रुवारीत 37 गुन्हे दाखल झाले.

प्रलोभनांना बळी पडू नका

अनेक सायबर गुन्हेगार हे व्हिएतनाम, तैवान कंबोडिया, सिंगापूर, दुबई अशा देशांतून फसवणुकीचे प्रकार करतात. भारतातूनच गेलेले काही गुन्हेगार यामध्ये आहेत. पोलिस आणि डिजिटल अरेस्टच्या भीतीने बँक बॅलन्सवर डल्ला मारला जातो. अज्ञान, भीती आणि लालसा याचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे प्रलोभनाला बळी न पडता, भीती न बाळगता अनोळखी व्हिडीओ आणि व्हॉट्सअॅप कॉलला बळी पडू नका, असं आवाहन ठाणे शहर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त पराग मणेरे यांनी केलं आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमधील गुन्हे

नोव्हेंबरमध्ये ऑनलाइन फ्रॉडचे 7, सोशल मीडिया फ्रॉड 14, आमिष दाखवल्याचा 1, ट्रेडिंगचे 15 असे 37 गुन्हे दाखल झाले. डिसेंबरमध्ये – फेक लोनचे 10, आमिषाचे 4, नोकरीचे आमिष 7, टास्कचे 7, ट्रेडिंगचे 22, आदीसह 62 गुन्हे दाखल झाले.

जानेवारी-फेब्रुवारीमधील गुन्हे

जानेवारीमध्ये फेक लोन 9, गिफ्ट 5, आमिष दाखवल्याचे 2, टास्कचे 12, ट्रेडिंगचे 17, पार्सल- डिजिटल अरेस्टचे 4 असे 49 गुन्हे तर फेब्रुवारीमध्ये-फेक लोनचे 5, गिफ्टचे 3, नोकरीचे 3, फ्रॉडचे 10, ट्रेडिंगचे 14, अरेस्टचे 3 असे 37 गुन्हे दाखल झाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!