आयपीएल 2025 एसआरएच वि पीबीके: हैदराबादमधील राजीव गांधी अंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शनिवारी रात्री झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडला. पंजाबच्या संघाने दिलेलं 246 धावांचं टार्गेट यजमान हैदराबादच्या संघाने 8 विकेट आणि 9 चेंडू राखून जिंकला. आयपीएलच्या इतिहासातील हा दुसरा सर्वोत्तम धावांचा पाठलाग ठरला. सनरायझर्सच्या संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने अगदी झपाटल्यासारखी फलंदाजी केली. दिसेल त्या बॉलरवर अभिषेक शर्मा तुटून पडला. अभिषेकने एकट्याने 141 धावा केल्या.
24 बॉलमध्ये 116 धावा
डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या अभिषेकने 55 बॉलमध्ये 141 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 14 चौकार आणि 10 षटकार लगावले. म्हणजेच अभिषेकने 24 बॉलमध्ये 116 धावा केल्या. अभिषेकने 256.36 च्या सरासरीने फटकेबाजी केली. अभिषेकची फटकेबाजी म्हणजे क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी होती.
उगाच वाकडेतिकडे शॉर्ट मारण्याऐवजी प्रॉपर क्रिकेटींग शॉट लगावत अभिषेकने ही ऐतिहासिक खेळी केली. अभिषेकच्या फटकेबाजीला पंजाबच्या गोलंदाजांना उत्तर देता आलं नाही.
कबूल करा
अभिषेक शर्मा | #प्लेविथफायर | #एसआरएचव्हीपीबीक्स | # Takaiph2025 pic.twitter.com/yiufnzh2cb
– सनरायझर्स हैदराबाद (@स्यून्रिझर्स) 12 एप्रिल, 2025
हेडची
दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादाचा दुसरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडनेही तुफान फलंदाजी केली. हेडने 37 चेंडूंमध्ये 66 धावा केल्या. हेडने 9 चौकार आणि 3 षटकार लगावले. अभिषेक आणि हेडने 12.2 ओव्हरमध्ये 171 धावांची सलामी दिली. या एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीविरांनी केलेल्या या भागीदारीचा फायदा सनरायझर्सला झाला. अभिषेकला सामानावीर पुरस्कार देण्यात आला.
लक्षात ठेवण्यासाठी एक ठोका, मालकीची एक रात्र
अभिषेक शर्मा निःसंशयपणे सामन्याचा खेळाडू आहे #एसआरएचव्हीपीबीक्स त्याच्या रेकॉर्ड-विखुरलेल्या कामगिरीसाठी
स्कोअरकार्ड https://t.co/rte7rlxdrq#Takelop | @Iamabhisarma4 pic.twitter.com/bqzqnytmoa
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) 12 एप्रिल, 2025
पंजाबचा फेर्केन
शनिवारचा दिवस गोलंदाजांचा नव्हताच हे सामना सुरु झाल्यानंतरच स्पष्ट झालं. पंजाबच्या फलंदाजांनीही उत्तम फटकेबाजी केली. प्रियांश आर्याने 13 बॉलमध्ये 36 धावा केल्या. प्रभासिमरन सिंगने 23 बॉलमध्ये 42 धावा केल्या. श्रेयस अय्यरने 36 बॉलमध्ये 82 धावांची खेळी केली. त्याला 22 बॉलमध्ये 27 धावा करत निहाल वधेरा आणि 11 बॉलमध्ये नाबाद 24 धावा करत उत्तम साथ दिली. पंजाबच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 245 धावांपर्यंत मजल मारली.
पॉइण्ट्स टेबलमध्ये सनरायझर्सला झाला फायदा
अभिषेक आणि हेडची खेळी पाहून अनेक चाहत्यांना त्यांनी मागील वर्षी केलेल्या धमाकेदार फलंदाजीची आठवण झाली. 6 सामन्यांमधील सनरायझर्सचा हा केवळ दुसरा विजय ठरला असला तरी त्यांना या विजयामुळे नेट रन रेटमध्ये फायदा झाला आहे. या सामन्यापूर्वी तळाशी असलेल्या सनरायझर्सच्या संघाने पॉइण्ट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी झेप घेतली आहे. मागील वर्षी मोठ्या धावसंख्येंमुळे चर्चेत राहिलेल्या सनरायझर्सच्या संघाने फलंदाजीच त्यांच्या विजयाचं गुपित असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.

































