Homeदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प टॅरिफ विराम देण्याच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेतील आशियाई बाजारपेठ आणि चिनी...

डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ विराम देण्याच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेतील आशियाई बाजारपेठ आणि चिनी समभागांना तपशील माहित आहेत


स्टॉक मार्केट अद्यतने: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्कासंदर्भात घेतलेल्या निर्णयानंतर त्यांच्या या धोरणामुळं जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा हादरा बदला. नव्या आर्थिक वर्षापासून भारतातही याचे परिणाम दिसून आलेय तर, आशियाई शेअर बाजारातही ट्रम्प शासनाच्या निर्णयाचे पडसाद उमटले. एकिकडून जागतिक आर्थिक मंदीचं सावट आणखी गडद होत असतानाच दुसरीकडून जगभरातील अनेक देशांनी या धोरणाचा कडाडून विरोध केला. ज्यानंतर 10 एप्रिल रोजी पुन्हा एकदा शेअर बाजारात महत्त्वाच्या घडामोडींनी वेग धरला. जिथं आशियाई शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळाली. यामागचं कारणही ठरला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा आणखी एक निर्णय.

ट्रम्प यांनी एकाएकी बहुतांश ट्रेडिंग पार्टनर अर्थात अनेक राष्ट्रांवर लावलेल्या इम्पोर्ट टॅरिफ म्हणजेच आयात शुल्कावरील नियमांवर 90 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती आणली. चीन आणि हाँगकाँगला मात्र या यादीतून वगळण्यात आलं आणि आणखी एक अट म्हणजे 10 टक्के आयात शुल्काची अट मात्र जै से थे ठेवण्याची. त्यांच्या या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम जपान आणि कोरियातील शेअर बाजारावर दिसून आला. जिथं जपानमध्ये Nikkei 225 इंडेक्स 8.66% नं वधारून 34,450 वर पोहोचला. तर, कोरियाता Kospi 5.69% नं उसळी घेऊन थेट 2,424.08 चा आकडा गाठताना दिसला.

फक्त आशियाच नव्हे, तर तिथं ऑस्ट्रेलियातही S&P/ASX 200 नंसुद्धा 4.69% ची वाढ घेतल्याचं पाहायला मिळालं. हाँगकाँगच्या Hang Seng इंडेक्स 1.8% ची उसळी घेत हे आकडे 20,628.86 वर पोहोचले.

दरम्यान 90 दिवसांसाठी आयात शुल्कासंदर्भातील या निर्णयाला स्थगिती देत X पोस्टच्या माध्यमातून म्हटलं, ’75 हून अधिक देशांनी अमेरिकी आयात शुल्काच्या धोरणावर सकारात्मक प्रतिक्रिया दिलीच. या देशांनी प्रत्युत्तराचं पाऊल न उचलता अमेरिकेसह सामंजस्याच्या माध्यमातून यावर तोडगा काढण्याचा मार्ग अवलंबला. त्यामुळं या देशांना 90 दिवसांसाठी या करातून सूट दिली जात आहे’. या भूमिकेसह ट्रम्प यांनी चीनच्या बाबतीत मात्र परखड भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं.

एकिकडे चीननं ट्रम्प यांचा रोष ओढावत जागतिक व्यापार युद्धाला हवा मिळालेली असतानाच दुसरीकडे या साऱ्यातच चीनमध्येही गुंतवणुकदारांना काही अंशी दिलासा मिळाला. कारण, चीनच्या  Shanghai Composite Index मध्ये 0.93% आणि Shenzhen Index मध्ये 2.5% ची तेजी पाहायला मिळाली. तुलनेनं आशियाई अर्थव्यवस्थेवर जास्त आणि जगातील इतर देशांमध्येही दिलासायक प्रमाणात ट्रम्प यांच्या या ‘दिलासादायक’ निर्णयाचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते, पैसे गुंतवण्यासाठी कन्या राशीच्या...

0
शनिवार, 1 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याचा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. मिथुन...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...
spot_img

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...
error: Content is protected !!