Homeमनोरंजन'सनातन संस्थे'च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

 

गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि ‘एटीएस’चे अधिकारी असल्याचे सांगून सनातनच्या साधकांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्याची भीती दाखवली जात आहे. यात गंभीर म्हणजे या चौकशीतून नाव वगळण्यासाठी लाच देखील मागितली जात आहेत. सनातन संस्था आणि तिचे साधक यांचा कोणत्याही गुन्ह्यात दुरान्वयेही संबंध नसतांना अशा प्रकारे बेकायदेशीर चौकशा होणे, अत्यंत दुर्दैवी आणि अन्याय्य आहे. नेमक्या कोणत्या कारणांसाठी या चौकशा केल्या जात आहेत, खरंच पोलीस प्रशासन या चौकशा करत आहे कि काही भ्रष्ट वा सनातन विरोधी पोलीस अधिकारी यामागे आहेत, या दृष्टीने आम्ही महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांची भेट घेतली. या अत्यंत गंभीर प्रकरणी त्वरित दखल घेऊन सामान्य कुटुंबातील साधना करणाऱ्या सत्त्वगुणी निष्पाप साधकांच्या चौकशा तत्काळ थांबवाव्यात, अशी मागणी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांकडे केली आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेला हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर हे देखील उपस्थित होते.

     या प्रकरणी आम्ही महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, एटीएस विभागाचे महासंचालक, तसेच सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिक्षक यांना भेटून याविषयी निवेदन देऊन ‘सनातन संस्थेच्या साधकांची कोणत्या कारणांमुळे चौकशी चालू आहे’ अशी विचारणा केली असता, अशी कोणतीही चौकशी करण्याविषयी आदेश देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. हे अत्यंत गंभीर असून नेमके कोण अधिकारी या बेकायदेशीररित्या चौकशा करण्याचे आदेश देत आहेत? ज्यांनी कधी पोलीस ठाण्याची पायरी देखील चढली नाही, अशा सनातनच्या निष्पाप साधकांना त्रास देत आहेत, याचीच चौकशी व्हायला हवी. तसेच अशी बेकायदेशीर चौकशी करून, धमकावून, लाच मागून सामान्य निष्पाप साधकांना त्रास देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी या वेळी करण्यात आली. संस्थेचे हितचिंतक, साधकांचे नातेवाईक, अर्पणदाते यांच्यादेखील अनाठायी चौकशा केल्या जात आहेत, हे अत्यंत गंभीर आणि वेदनादायी आहे, अशी उद्विघ्न प्रतिक्रिया श्री. वर्तक यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

0
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव; अमोल वानखडे यांना  ‘हिंदुरत्न’, तर प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’       पुणे / सातारा :...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
error: Content is protected !!