Homeपुणे / पिंपरी-चिंचवडहिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव; अमोल वानखडे यांना  ‘हिंदुरत्न’, तर प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’

      पुणे / सातारा : राष्ट्र उभारणी, धर्मप्रसार आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हिंदु जनजागृती समितीच्या दोन कार्यकर्त्यांना नुकतेच प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे श्री. अमोल वानखडे यांना महाराष्ट्र राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. रवींद्र साठे यांच्या हस्ते ‘हिंदुरत्न पुरस्कार २०२६’, तर सातारा येथे प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या सापटणेकर यांच्या हस्ते ‘नवदुर्गा सन्मान २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.

       राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून पुण्यातील ‘संकल्प बँक्वेट हॉल’ येथे ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा पार पडला. राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र साठे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील ६७ मान्यवरांना या वेळी गौरवण्यात आले. पद्मश्री डॉ. मणिभाई मानवसेवा ट्रस्टचे संस्थापक डॉ. रवींद्र भोळे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात श्री. वानखडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आपण समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या चरणी समर्पित करत असल्याचे श्री. वानखडे यांनी म्हटले आहे.     

  दुसरीकडे सातारा येथील ‘श्री पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने २५ ऑक्टोबरला आयोजित सोहळ्यात प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’ देऊन गौरवण्यात आले. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे आणि अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या सापटणेकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील अन्य आठ कर्तृत्ववान महिलांसह त्यांचा सन्मान करण्यात आला.

  या पुरस्कार सोहळ्यात बोलताना श्री. रवींद्र साठे म्हणाले की, नागरिकांनी मातृभूमीवर प्रेम करत स्वदेशी वस्तूंच्या वापरावर भर दिल्यास देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनेल. हिंदु एकात्मतेचे तसेच राष्ट्रभक्तीचे कार्य निःस्वार्थ भावाने करणाऱ्या पुरस्कारार्थींचे त्यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमात ‘मोमेंटो’ या परकीय शब्दाऐवजी ‘स्मृतीचिन्ह’ या शब्दाचा वापर आणि मेणबत्तीऐवजी पारंपरिक दिव्याने दीपप्रज्वलन करण्याचा आग्रह धरून श्री. साठे यांनी भारतीय संस्कृतीचा आदर्श उपस्थितांसमोर ठेवला.

  सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे आज संपूर्ण भारत अखंड आहे. त्यांनी ५६० हून अधिक संस्थाने विलीन करून घेतली. त्यांच्याच कार्याचे स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम प्रतिवर्षी घेतला जातो. हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्यांना पुढील कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी, हा हा पुरस्कार देण्यामागील उद्देश आहे, असे मत पद्मश्री डॉ. मणिभाई मानवसेवा ट्रस्टचे संस्थापक डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, तर वृश्चिक, मकर राशीच्यांना बढती-नवीन जबाबदारीचे योग

0
बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसमोर पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी येऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी पदोन्नती, नवीन जबाबदारी आणि नवीन नोकरीचे...

मंगळवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या व्यक्तींना प्रमोशन आणि मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू...

0
मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा आर्थिक लाभ...
spot_img

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
error: Content is protected !!