Homeई-पेपर = साप्ता. मुळशी दिनांकश्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा;...

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात प्रतिवादी करू!

हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा

पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या बेकायदेशीर हस्तांतरणप्रकरणी ‘हिंदु जनजागृती समिती’ने पुणे विभागीय आयुक्तांना थेट कायदेशीर इशारा दिला आहे. ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम’मधील कलम १८, १९, २१, २२ आणि २२-अ अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून देवीच्या नावे असलेल्या सर्व जमिनींचा प्रत्यक्ष ताबा तातडीने मिळवावा; अन्यथा शासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या प्रतिवादी करून उच्च न्यायालयात नवीन जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.
मंदिराच्या १६६८.१४ हेक्टर जमिनी आणि कोट्यवधी रुपयांच्या दानपेटी घोटाळ्याप्रकरणी हिंदु जनजागृती समितीची जनहित याचिका (क्र. २१/२०१८) मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात प्रलंबित आहे. श्री तुळजाभवानी देवस्थानाच्या हजारो एकर भूखंड घोटाळ्याप्रकरणी विधिमंडळात महसूलमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शासनाने २० जुलै २०२६ रोजी पुणे विभागीय आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने खटला लढवणारे अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी सविस्तर कायदेशीर नोटीस वजा निवेदन सादर केले. हे निवेदन देताना अधिवक्ता (पू.) सुरेश कुलकर्णी, अधिवक्ता उमेश भडगावकर, तसेच पुणे येथून अधिवक्ता (सौ.) मुग्धा बिवलकर आणि अधिवक्ता (सौ.) सुनंदा येवले उपस्थित होत्या.
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह अनेक हिंदु राजे आणि देशभरातील भाविकांनी श्री तुळजाभवानी देवीला मोठ्या प्रमाणावर जमिनी दान दिल्या होत्या. खुद्द निजामाच्या गॅझेटिअरमध्येही देवीच्या नावे १६६८.१४ हेक्टर जमिनीची अधिकृत नोंद आहे; मात्र १९६२ मध्ये मंदिराचे नियंत्रण शासनाकडे आल्यानंतर मूळ जमिनींचे संरक्षण आणि पुनर्प्राप्ती यासाठी आवश्यक ती कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही. उलट हजारो हेक्टर जमीन पूर्वीपासूनच चार मठांच्या ताब्यात असल्याचे चित्र निर्माण करून मूळ जमिनींच्या प्रश्नाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप समितीने केला आहे. प्रशासनाने आता केवळ चौकशीचे सोपस्कार न करता, कायद्यातील अधिकारांचा थेट वापर करून सर्व नोंदींची सखोल पडताळणी करावी आणि बेकायदेशीररीत्या हस्तांतरित झालेल्या जमिनी पुन्हा देवस्थानच्या नावे नोंदवून त्यांचा प्रत्यक्ष ताबा मिळवावा, अशी ठाम मागणी या वेळी करण्यात आली.
७ जानेवारी २०१० रोजी विधी व न्याय विभागाचे तत्कालीन सहसचिव एम. जी. गिरटकर यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालाकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तसेच, धाराशिवच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती आणि तुळजापूर देवस्थानच्या अध्यक्षांनाही यापूर्वी कायदेशीर आक्षेप सादर करण्यात आले होते. देवस्थानची मालमत्ता सुरक्षित करण्यासाठी तातडीने कायदेशीर कारवाई न केल्यास, या निष्काळजीपणाला जबाबदार असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक तसेच अधिकृत क्षमतेत प्रतिवादी करून उच्च न्यायालयात नवीन जनहित याचिका दाखल करण्यात येईल, असे हिंदु जनजागृती समितीने स्पष्ट केले आहे.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...
error: Content is protected !!