Homeमहाराष्ट्रदिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटींचा सिलसिला:अमित शाहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट,...

दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटींचा सिलसिला:अमित शाहांनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, विकासकामांच्या चर्चेचा दावा

राजधानी दिल्लीत सध्या राजकीय भेटीगाठींना वेग आला असून, त्यातून महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील अमित शाह यांची भेट घेतल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सुनील तटकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. “नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मतदारसंघातील व राज्यातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली तसेच त्यांचे मार्गदर्शन घेतले,” असे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे. मात्र, अवघ्या चोवीस तासांत गृहमंत्री आणि पंतप्रधानांची घेतलेली भेट केवळ विकासकामांपुरती मर्यादित नसून यामागे मोठे राजकीय गणित असल्याचा दावा विश्लेषक करत आहेत. शरद पवार गटाचीही ‘शाह-भेट’; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीला बीडचे खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा शरद पवार गट केंद्र सरकारला पाठिंबा देईल, अशा राजकीय अफवा रंगल्या आहेत. दोन्ही गटांतील वरिष्ठ नेत्यांनी या भेटींचे कारण ‘प्रलंबित विकासकामे आणि मतदारसंघातील प्रश्न’ असे सांगितले असले, तरी प्रत्यक्ष बैठकीत कोणत्या गुप्त मुद्द्यांवर चर्चा झाली, याचा तपशील दोन्ही बाजूंकडून अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या भवितव्यावर पुन्हा चर्चांना उधाण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)शी संवाद वाढत असल्याच्या चर्चांनाही बळ मिळाले आहे. एका बाजूला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सलग दिल्ली भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणापासून ते एनडीएतील नव्या राजकीय समीकरणांपर्यंत अनेक शक्यता चर्चेत आहेत. मात्र, या सर्व भेटी विकासकामे आणि प्रलंबित प्रशासकीय विषयांपुरत्याच मर्यादित असल्याचे संबंधित नेत्यांकडून सांगितले जात असले, तरी भेटींमागील राजकीय अर्थ काय, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

डिजिटल अटकेला स्वतंत्र गुन्हा बनवण्यावर केंद्राने विचार करावा:सर्वोच्च न्यायालयाने म्हटले – यासाठी कठोर शिक्षेची...

0
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला सांगितले की, त्यांनी डिजिटल अटकेला फौजदारी कायद्यात औपचारिकपणे परिभाषित करण्याचा आणि कठोर शिक्षेसह स्वतंत्र गुन्हा म्हणून घोषित करण्याचा...

सर्वोच्च न्यायालय म्हणाले- विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते:लोकशाहीत आंदोलने होत राहतील; गरजेपेक्षा जास्त बळाचा...

0
निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने म्हटले की, विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण होते, जे घटनात्मक चौकटीत...

पेट स्कॅन चाचणी आता 3 हजारांत:शासकीय कर्करोग रुग्णालयात कर्करुग्णांना मोठा दिलासा

0
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात 'पेट स्कॅन' चाचणी शुल्कात मोठी कपात करण्यात आली आहे. आता कर्करुग्णांना १५,४८७ रुपयांऐवजी केवळ ३,००० रुपये मोजावे...

चंदीगड न्यायालयात दीपके-वांगचुक, कामरा यांच्यावर FIR ची मागणी:वकिलाची याचिका- जंतर-मंतरवर CJP च्या आंदोलनात अपमानकारक...

0
कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर, चंदीगडमध्ये पर्यावरणवादी सोनम वांगचुक, स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा आणि CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात...
spot_img

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...

नकारात्मक विचारांना हरवेल ‘ब्रॅग फोल्डर, येथे जमा करा यश:मेंदू पराभव लक्षात ठेवतो, विजय नाही;...

0
कधी लक्ष दिलं आहे का... फोनच्या गॅलरीमध्ये जुन्या पावत्या, निरुपयोगी स्क्रीनशॉट्स आणि अनेक वर्षांपूर्वीच्या कागदपत्रांचे फोटो भरलेले असतील. पण जर तुम्हाला विचारलं की...

कंगना म्हणाली- जेन-झी आंदोलनाच्या रील्स पाहून उलटी येते:यांची कशी वाढ होत आहे; ‘कॉकरोच’सारखे वागून...

0
अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर निशाणा साधला आहे. कंगनाने...
error: Content is protected !!