बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून राज्य शासनाची तब्बल १९० कोटी रुपयांची महाप्रचंड आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जळगावचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणीकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत या गंभीर घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांचे काळे कारनामे पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. पोलिस तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, शशिकांत हिंगणीकर हे जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना, त्यांनी कोणत्याही वैध प्रस्तावाशिवाय बोगस वैयक्तिक मान्यता दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या महाघोटाळ्यात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील तब्बल ४५९ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने खोटे आणि बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करण्यात आले. या बनावट आयडींच्या माध्यमातून शासनाकडून नियमित वेतन (पगार) आणि मोठ्या रकमेची थकबाकी उकळण्यात आली असून, शासनाची एकूण १९० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले आहे की, शशिकांत हिंगणीकर हे जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना, त्यांनी कोणताही कायदेशीर किंवा वैध प्रस्ताव नसताना या कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता दिल्या होत्या. १२०० हून अधिक आरोपींचा समावेश या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असून, यामध्ये केवळ एक-दोन अधिकारी नाही, तर साखळी पद्धतीने काम झाले आहे. या संपूर्ण घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे १,२०० आरोपी निष्पन्न झाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. यामध्ये अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण विभागातील इतर लिपिक व अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे. धुळ्यात सापळा रचून अटक; पुढील तपास सुरू नाशिक शहर गुन्हे शाखेला शशिकांत हिंगणीकर यांच्या ठावठिकाण्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांच्या विशेष पथकाने धुळे शहरात सापळा रचला आणि हिंगणीकर यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नाशिकरोड पोलिस ठाण्यात आणून अधिकृतरीत्या अटक करण्यात आली. या कोट्यवधी रुपयांच्या महाघोटाळ्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुन्हे शाखेकडून अत्यंत गतीने सुरू आहे. या तपासात शिक्षण विभागातील आणखी किती बड्या धेंडांचे धाबे दणाणणार आणि कोण-कोण गजाआड जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. हे ही वाचा राज्यात CSR निधी वाटपात मोठा असमतोल:मागास जिल्ह्यांच्या वाट्याला तुटपुंजी रक्कम, 8630 कोटींपैकी 51 टक्के निधी एकट्या मुंबईत खर्च कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीचा मुख्य उद्देश वंचित आणि मागास भागांचा विकास साधून समाजहिताचे प्रकल्प राबवणे हा असला, तरी महाराष्ट्रातील आर्थिक वर्ष 2024-25 मधील वास्तव याच्या अगदी उलट आहे. ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात खर्च झालेल्या सीएसआर निधीतील सर्वाधिक वाटा आधीच विकसित असलेल्या जिल्ह्यांना मिळाला असून, खऱ्या अर्थाने गरज असलेल्या मागास जिल्ह्यांच्या वाट्याला मात्र अत्यल्प निधी आला आहे. परिणामी, ‘जिथे आधीच विकास आहे तिथेच अधिक विकास’ आणि ‘जिथे विकासाची खरी गरज आहे तिथे निधीचा दुष्काळ’ असा स्पष्ट विरोधाभास या खर्चातून समोर आला आहे. सविस्तर वाचा… सरन्यायाधीशांवर संसदेत महाभियोग चालवा:धर्मेंद्र प्रधानांची हकालपट्टी करा, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनातून रोहित पवारांची मागणी राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या ‘कॉकरोज जनता पार्टी’च्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पूर्ण पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजीत दीपके यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर तर जोरदार निशाणा साधलाच, पण त्यासोबत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवर (CJI) संसदेत महाभियोग चालवून त्यांना पदच्युत करावे, अशी खळबळजनक मागणी केली आहे. सविस्तर वाचा…
Source link
बनावट ‘शालार्थ आयडी’द्वारे 190 कोटींचा घोटाळा:माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक, नाशिक रोड पोलिसांची कारवाई
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
तुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!
मराठी बातम्याराष्ट्रीयतुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करामेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६...
गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...
वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...
वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन
पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...
ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...





























