Homeमहाराष्ट्रपुण्यात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाचा फज्जा:काँग्रेस भवनसमोर 10 मिनिटांत घोषणाबाजी करून आंदोलन...

पुण्यात भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाचा फज्जा:काँग्रेस भवनसमोर 10 मिनिटांत घोषणाबाजी करून आंदोलन संपले

पुण्यात काँग्रेस भवनसमोर भारतीय जनता युवा मोर्चाने आयोजित केलेले आंदोलन बुधवारी फज्जा ठरले. केवळ 30 ते 35 कार्यकर्ते उपस्थित होते आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटांत घोषणाबाजी करून आंदोलन संपवण्यात आले. काँग्रेस देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाजवळ राहुल गांधी व काँग्रेसने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले होते. पुणे शहर भाजप युवा मोर्चा आघाडीचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी आंदोलनाची घोषणा केली होती, मात्र ते स्वतःच आंदोलनात अनुपस्थित होते. मागील अनुभवावरून पोलिसांनी यावेळी मोठी खबरदारी घेतली होती. काँग्रेस भवन येथे चारही बाजूंनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पुणे मनपा ते बालगंधर्व दरम्यानचा रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. विविध ठिकाणी बॅरिकेट्स आणि वाहने लावून परिसर छावणीत बदलला होता. दरम्यान, काँग्रेस भवन येथे काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. काँग्रेस शहराध्यक्ष दीप्ती चौधरी आणि प्रशांत जगताप यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पुण्यात राजभवन येथे आंदोलन केले. दहावी उत्तीर्ण नसलेले लोक देशावर राज्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नीट परीक्षा पेपरफुटीमुळे देशात २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींच्या आंदोलनांना दडपण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, भाजप कार्यकर्ते काँग्रेस भवनवर लाठी, काठी, दगड घेऊन येतात, पण आम्ही त्यांचे फुलांनी स्वागत करू, असे ते म्हणाले. तसेच, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सर्वोच्च न्यायालय म्हणाले-पॅलेट गनच्या वापरावर सध्या बंदी नाही:पोलिसांना विशेष परिस्थितीत वापरण्याचा अधिकार; सरकारकडून वापरासाठी...

0
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पॅलेट गनच्या वापरास सध्या बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, पोलीस विशेष परिस्थितीत पॅलेट गनचा वापर करू शकतात....

तुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!

0
मराठी बातम्याराष्ट्रीयतुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करामेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६...

गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट

0
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
spot_img

वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...

0
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...

कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...

0
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...

0
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...

ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले

0
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...
error: Content is protected !!