नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे सेक्टर-19 परिसरात रात्रीच्या सुमारास गुंडगिरीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर बसण्याला विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून दोन तरुणांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत एका तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. इतकेच नव्हे, तर मुलाचा जीव वाचवण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी मध्ये आलेल्या त्याच्या आईलाही आरोपींनी सोडले नाही; तिच्या डोक्यात शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दहशतीचे वातावरण पसरले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोपरखैरणे गावातील सेक्टर-19 मधील योगिता मेडिकलजवळील एका घरासमोर काही तरुण नियमितपणे अड्डा जमावून बसत असत. एका स्थानिक महिलेने या त्रासाला कंटाळून त्यांना तिथे बसण्यास ठाम विरोध केला होता. याच गोष्टीचा राग मनात धरून संतापलेल्या आरोपींनी त्या महिलेच्या मुलाला शिवसेना शाखेसमोर गाठले. काही समजण्याच्या आतच आरोपींनी तलवार आणि चॉपरसारख्या धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला. मुलाला वाचवण्यासाठी आई पुढे धावली असता, नराधमांनी तिच्यावरही वार केले. या हल्ल्यात आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाला अटक, फरार साथीदाराचा शोध सुरू या घटनेची गंभीर दखल घेत कोपरखैरणे पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS), ‘शस्त्र अधिनियम’ तसेच ‘महाराष्ट्र पोलिस अधिनियमा’अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत, तर त्याचा दुसरा साथीदार अद्याप फरार आहे, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून त्याला लवकरच गजाआड केले जाईल, असे कोपरखैरणे पोलिस सांगितले आहे.
Source link
नवी मुंबईत गुंडांचा हैदोस:घरासमोर बसू नको म्हणाणाऱ्या तरुणासह आईवर तलवार अन् चॉपरने जीवघेणा हल्ला, एकाला अटक
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
सर्वोच्च न्यायालय म्हणाले-पॅलेट गनच्या वापरावर सध्या बंदी नाही:पोलिसांना विशेष परिस्थितीत वापरण्याचा अधिकार; सरकारकडून वापरासाठी...
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पॅलेट गनच्या वापरास सध्या बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, पोलीस विशेष परिस्थितीत पॅलेट गनचा वापर करू शकतात....
तुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!
मराठी बातम्याराष्ट्रीयतुम्ही तुमची सीट ऑनलाइन आरक्षित करू शकता, फेरीनंतर प्रत्येक वेळी उपस्थित राहण्याची गरज नाही!नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करामेडिकल काउन्सेलिंग कमिटीने नीट-यूजी २०२६...
गुरु पौर्णिमा 2026 | हरिद्वार हरकी पौरी गंगा स्नान भक्त अपडेट
हरिद्वार14 तासांपूर्वीलिंक कॉपी कराआषाढ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणाऱ्या गुरुपौर्णिमा पर्वाने धर्मनगरी हरिद्वारला पुन्हा एकदा श्रद्धेच्या रंगात रंगवले. वेदांचे रचयिता महर्षी वेद व्यास यांच्या...
वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
वैभव सूर्यवंशी दलीप ट्रॉफीमध्ये ईस्ट झोनचा उपकर्णधार:ईशान किशनला कर्णधारपद, मोहम्मद शमी आणि मुकेश कुमारही...
दलीप ट्रॉफीच्या 2026-27 हंगामासाठी ईस्ट झोन संघाची घोषणा करण्यात आली आहे. ईशान किशनला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला उपकर्णधारपदाची...
कामाची बातमी- महाराष्ट्रात 23 लाख लिटर भेसळयुक्त दूध:तुम्हीही सिंथेटिक दूध तर पीत नाही ना,...
नुकतेच महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात सिंथेटिक दूध बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलीस आणि ‘अन्न व औषध प्रशासन’ (FDA) च्या कारवाईत मोठ्या...
सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१ ठिकाणी; तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवाचे...
राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा! - सनातन संस्थेचे आवाहन
पुणे - ‘अमेरिका-इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद,...
ज्ञानेश्वरी यादवने रौप्य पदक जिंकले
मराठी बातम्याखेळज्ञानेश्वरी यादवने जिंकले रौप्य पदक | कॉमनवेल्थ गेम्स 2026 वेटलिफ्टिंगग्लासगो24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारताने कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये सहावे पदक जिंकले आहे. बिंदियारानी...






























