Homeमहाराष्ट्रखलील शेख आत्महत्या प्रकरण:रवींद्र धंगेकर दाम्पत्य 'नॉट रिचेबल'; अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव,...

खलील शेख आत्महत्या प्रकरण:रवींद्र धंगेकर दाम्पत्य ‘नॉट रिचेबल’; अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव, पोलिसांची पथके रवाना

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि लेबर काँट्रॅक्टर खलील शेख यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता मोठे राजकीय वळण घेतले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी आमदार आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली आहे. धंगेकर आणि त्यांच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार असल्याने हे दाम्पत्य सध्या ‘नॉट रिचेबल’ झाले आहे. पोलिसांची विशेष पथके त्यांच्या शोधासाठी रवाना झाली असून, दुसरीकडे धंगेकर यांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कायदेशीर हालचाली सुरू केल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अटकेची कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर मोबाईल बंद करून अज्ञातस्थळी गेले आहेत. संभाव्य अटक टाळण्यासाठी धंगेकर दाम्पत्याने न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अटकपूर्व जामीन अर्जावर येत्या सोमवारी न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून धंगेकर कायदेशीर सल्लागारांच्या संपर्कात राहून अज्ञातवासात गेल्याचे सांगण्यात येत आहे. दोन सुसाईड नोट आणि अडीच कोटींची थकबाकी खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी सविस्तर व्हिडिओ बनवला होता, तसेच दोन पानी सुसाईड नोटही लिहिल्याचे तपासात समोर आले आहे. शेख यांनी ज्या इमारतीमध्ये आत्महत्या केली, तिच्या बाहेर एक चिठ्ठी चिकटवली होती, तर दुसरी चिठ्ठी पोलिसांना त्यांच्या खिशात सापडली. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. खलील शेख यांनी चिठ्ठीत आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्यांची नावे लिहीत, संबंधितांकडे अडीच कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे नमूद केले आहे. शेख हे २०११ पासून पुण्यात सेंट्रिंगचे काम करत होते. या कामांसाठी त्यांनी बाहेरून चढ्या व्याजाने पैसे उचलले होते. भागीदारीतील मुख्य नेत्यांनी “आम्ही व्याजासह पैसे परत करू” असे आश्वासन दिले होते, मात्र ऐनवेळी पैसे न मिळाल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. “भागीदार फक्त नावाला, मुख्य कारभार धंगेकरांचाच!” पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत खलील शेख यांच्या पत्नीच्या अधिकृत तक्रारीनंतर आता या गुन्ह्यात आरोपींची संख्या १४ वर पोहोचली असून स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या ‘उत्कर्ष असोसिएट्स’ फर्मच्या प्रकल्पावरून हा वाद सुरू होता, त्यामध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्या पत्नी वर्षा शेडगे आणि रघू गौडा यांच्या पत्नी भागीदार आहेत. मात्र, खलील शेख यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबाबात गंभीर आरोप केला आहे. त्यानुसार, “या कंपनीत महिला केवळ नावालाच भागीदार होत्या, कंपनीचा सर्व आर्थिक व्यवहार आणि मुख्य कारभार स्वतः रवींद्र धंगेकर हेच सांभाळत होते.” पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास चक्र वेगवान केले आहे. खलील शेख नेमके कोणाकडे पैशांसाठी हेलपाटे मारत होते, आर्थिक व्यवहारात कोणाची काय भूमिका होती आणि अडीच कोटींच्या थकबाकीमध्ये कोणाचा किती वाटा आहे, याचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी धंगेकरांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान सध्या पुणे पोलिसांसमोर आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते, पैसे गुंतवण्यासाठी कन्या राशीच्या...

0
शनिवार, 1 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याचा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. मिथुन...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
spot_img

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...

‘के-शेप्ड इकॉनॉमी’ परिणाम दाखवत आहे:1400 रुपयांच्या आईस्क्रीमच्या रांगेत लपले आहे अमेरिकन अर्थव्यवस्थेचे सत्य

0
अमेरिकेतील हॉप्किन्स, मिनेसोटा या एका छोट्या शहरात प्रत्येक ऋतूत एकसारखेच दृश्य दिसते. 27 अंश सेल्सिअस उष्णता असो किंवा बर्फाळ थंडी, लोक एकाच गोष्टीसाठी...
error: Content is protected !!