Homeमहाराष्ट्रपुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात...

पुणे शहरात विविध अपघातांत 3 जणांचा मृत्यू:कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात घटना

पुणे शहरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी आणि पुणे-अहमदनगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास रस्त्यात थांबलेल्या एका ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात ट्रकमधील मदतनीस (क्लिनर) जमसुद्दीन मोहम्मद गौसदेसाई (वय ४२) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस शिपाई बालाजी पांचाळ यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी पुढील तपास करत आहेत. पुणे-अहमदनगर रस्त्यावर लोणीकंद परिसरात १४ जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार हरिभाऊ कांदे यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी रामराव कांदे गंभीर जखमी झाले आहेत. कांदे यांचे नातेवाईक परमेश्वर मच्छिंद्र चाटे (वय २६, रा. खांदवेनगर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मांजरी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक कोडिंबा निसाळकर (वय ६१) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे दोन नातू शिवम (वय ६) आणि आरव (वय ६) गंभीर जखमी झाले. हडपसरमधील मांजरी स्टड फार्म रस्त्यावर बुधवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली. अरुण कोडिंबा निसाळकर (वय ३४, रा. रुखमाई सृष्टी पार्क, मांजरी फार्म) यांनी या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला असून, उपचारादरम्यान कोडिंबा निसाळकर यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत. हेही वाचा.. फुरसुंगी गोळीबार:सोशल मीडियामधून ‘बिश्नोई’ गँगच्या संपर्कात आला आरोपी, सिग्नल ॲपवरून कट रचल्याचे स्पष्ट फुरसुंगी येथील एका स्टील व्यापाऱ्याच्या गोदामावर झालेल्या गोळीबार (फायरिंग) प्रकरणाच्या तपासात पुणे पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाची माहिती लागली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी रवी कुमार याने पोलिस चौकशीत धक्कादायक खुलासे केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून बिश्नोई गँगच्या संपर्कात आल्याचे त्याने मान्य केले आहे. सविस्तर वाचा..



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

अमृतसरमध्ये बॉयफ्रेंडला जिवंत जाळले:ब्रेकअपनंतर भेटायला आला होता, गर्लफ्रेंड आणि तिचा चुलत भाऊही भाजले, दोघांना...

0
अमृतसरमध्ये गर्लफ्रेंडने चुलत भावासोबत मिळून बॉयफ्रेंडला जिवंत जाळले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आग लागल्यावर संतापलेल्या बॉयफ्रेंडने दोघांनाही आपल्याकडे ओढले. त्यामुळे गर्लफ्रेंड आणि तिचा...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपले विचार सकारात्मक, वाणी मधुर आणि संयमित असावी, सर्व लोकांशी...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; आपले विचार सकारात्मक असले पाहिजेत, आपले बोलणे दयाळू आणि आदरयुक्त असले पाहिजे...

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

सर्वोच्च न्यायालय सीबीएसई डिजिटल मार्किंग सिस्टम

0
नवी दिल्ली14 तासांपूर्वीलिंक कॉपी करासर्वोच्च न्यायालयाने बुधवारी CBSE च्या ऑन स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीबाबत विद्यार्थ्यांच्या नाराजीबद्दल चिंता व्यक्त केली. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले,...
spot_img

इंग्लंडविरुद्ध भारत सलग चौथी वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल:दुसरा सामना आज; कार्डिफमध्ये 15 वर्षांपासून...

0
भारताला इंग्लंडविरुद्ध सलग चौथी वनडे मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने 2021 मध्ये घरच्या मैदानावर 2-1 ने, 2022 मध्ये इंग्लंडमध्ये 2-1 ने आणि...

वनडे व टी-20 विश्वचषक नव्या फॉरमॅटमध्ये होईल:वनडेत सुपर-7 द्वारे सेमीफायनलिस्ट, टी-20 मध्ये सुपर-10 ने...

0
ICC ने पुरुष एकदिवसीय आणि टी-20 विश्वचषकाच्या फॉरमॅटमध्ये बदलांना मंजुरी दिली आहे. एकदिवसीय विश्वचषकात 14 संघांसह नवीन थ्री-स्टेज फॉरमॅट लागू होईल, ज्यात पहिल्यांदाच...

जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026

0
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...

आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती

0
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
error: Content is protected !!