इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत अटक करण्यात आलेल्या नऊ आरोपींची धिंड काढली. न्यायालयाने सर्व आरोपींना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध सुरू आहे. पर्यटकांवरील हल्ल्यानंतर पोलिसांचा दणका भावली धरण आणि रिसॉर्ट परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिकरोड येथील भागवत कुटुंबावर सोमवारी सायंकाळी काही स्थानिक तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांना जाब विचारल्यानंतर वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि बेसबॉल स्टिकच्या साहाय्याने कुटुंबावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली होती. सात किलोमीटर पाठलाग करून कारची तोडफोड हल्ल्यानंतरही आरोपी थांबले नाहीत. त्यांनी भागवत कुटुंबाच्या कारचा तब्बल सात किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. घोटी टोलनाक्याजवळ कार अडवून वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. यावेळी महिलेचा विनयभंग करण्यात आला, तसेच तिचा मोबाईल आणि सोन्याची साखळी हिसकावून आरोपी पसार झाले. जीव वाचवत कुटुंबाने अंबड पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. गंभीर गुन्ह्यांखाली नऊ जणांना अटक या प्रकरणाची गंभीर दखल घेत सुरुवातीला अंबड पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास इगतपुरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, दरोडा, विनयभंग आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिसांनी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी सांगितले की, या प्रकरणातील एका फरार आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून, उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल. पर्यटकांच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. संबंधित बातमी वाचा.. भावली धरणावर छेडछाड, कुटुंबावर हल्ला:कारचा पाठलाग करत लूटमार करणाऱ्या 9 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात भावली डॅम आणि रिसॉर्ट परिसरात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची धिंडवडे काढणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 12) सायंकाळी सहाच्या सुमारास नाशिकरोड येथील एका कुटुंबावर स्थानिक गुंडांनी लाकडी दांडे, लोखंडी रॉड आणि बेसबॉल स्टिकने जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी समोर आली आहे. याप्रकरणी अंबड पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ‘भारतीय न्याय संहिता 2023’ (BNS) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, लूटमार, विनयभंग आणि बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 9 जणांना अटक केली आहे. सविस्तर वाचा..
Source link
इगतपुरीतील पर्यटक मारहाण प्रकरण:9 आरोपींची पोलिसांनी काढली धिंड; 18 तारखेपर्यंत कोठडी
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...
आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
भारतावर 100% शुल्क लावू शकतो अमेरिका:रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर कारवाईची तयारी, संसदेत विधेयक...
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याची तयारी सुरू केली आहे. अमेरिकन सिनेटमध्ये एक विधेयक सादर करण्यात आले आहे, ज्यात भारत, चीनसह...
जगन्नाथ रथयात्रा पुरी 2026
1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराभगवान जगन्नाथांची रथयात्रा १६ जुलै रोजी सुरू होईल आणि २४ जुलैपर्यंत चालेल. हा सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक आहे. दरवर्षी...
आमिर खानची लव्ह जिहादची प्रतिक्रिया; गौरी स्प्रेट विवाह पंक्ती
37 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करातिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं...
Ai+ ची नवीन स्मार्टफोन मालिका नोवा 2 लॉन्च:रंग बदलणाऱ्या कस्टमाइजेबल लाइट्स आणि 6000mAh बॅटरी;...
टेक ब्रँड Ai+ ने भारतात दोन नवीन बजेट-फ्रेंडली 5G स्मार्टफोन नोवा 2 प्रो आणि नोवा 2 निओ लॉन्च केले आहेत. कंपनीने दोन्ही हँडसेट...
स्विगी इंस्टामार्ट एचपीसीएल एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी लाँच
बेंगळुरू2 तासांपूर्वीलिंक कॉपी करास्विगीच्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्टने एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी सुरू करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या अंतर्गत...




























