राज्याच्या राजकारणात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक करत असताना, दुसरीकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी मोठ्या राजकीय भेटीगाठ सुरू आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांपाठोपाठ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही फडणवीसांची भेट घेतल्याने, शरद पवार गटदेखील ‘एनडीए’मध्ये सामील होणार असल्याच्या जोरदार चर्चांना उधाण आले आहे. अजितदादा गटाची पुन्हा अर्थ खात्यावर नजर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अजित पवार गटाकडून पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वित्त (अर्थ) विभागाची जोरदार मागणी केली जात असल्याचे समजते. आगामी निवडणुका आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जयंत पाटलांची एन्ट्री अन् चर्चांना उधाण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची भेट सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जयंत पाटील यांच्या या अचानक झालेल्या भेटीचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, शरद पवार गटही सत्ताधारी ‘एनडीए’मध्ये सामील होण्याच्या तयारीत तर नाही ना? असा कयास आता राजकीय तज्ज्ञांकडून लावला जात आहे. फडणवीसांच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकाच वेळी चर्चेला बसले होते. शरद पवार गटाचे प्रतिनिधी म्हणून जयंत पाटील, तर अजित पवार गटाच्या वतीने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात फडणवीसांच्या उपस्थितीत अत्यंत सविस्तर चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्ली ते मुंबई राजकीय खलबते
महाराष्ट्रात या अत्यंत महत्त्वपूर्ण गाठीभेटी सुरू असताना, दुसरीकडे दिल्लीत एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातही महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. दिल्ली ते मुंबई सुरू असलेल्या या समांतर राजकीय घडामोडींमुळे लवकरच राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठा निर्णय किंवा राजकीय भूकंप पाहायला मिळू शकतो, अशी शक्यता निर्माण झाली आहे. ४५ मिनिटांची बैठक आणि विकासकामांवर मंथन अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तब्बल पाऊण तास ही महत्त्वाची बैठक चालली. या बैठकीचे नेतृत्व स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले, तर शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेदेखील होते. ‘उबाठा’ गटातून शिवसेनेत आलेल्या या सहाही खासदारांच्या आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांना गती कशी देता येईल, यावर या बैठकीत अत्यंत सकारात्मक आणि सखोल चर्चा करण्यात आली. केंद्राकडून निधीची कमतरता नाही; शाहांची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीला आलेल्या या सर्व खासदारांचे स्वागत केले. केंद्राच्या अखत्यारीत असणारे विविध मोठे प्रकल्प, आवश्यक असणारा निधी आणि मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी, अशी मागणी या खासदारांनी शाहांकडे केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून निधी किंवा इतर कोणत्याही मदतीची अजिबात कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही अमित शहा यांनी या खासदारांना दिली. ‘पावसासोबतच चांगल्या गोष्टींची सुरुवात’ या सदिच्छा भेटीनंतर बाहेर आल्यावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी एक अतिशय सूचक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन आता सुरू होत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी एक अतिशय चांगली गोष्ट आहे. योगायोगाने आज दिल्लीत चांगला पाऊसही पडला आहे. त्यामुळे या पावसामुळे दिल्लीत अतिशय सकारात्मक वातावरणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (बुधवारी) दिल्लीतच एक विशेष पत्रकार परिषद घेणार आहेत. शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नेमकी काय राजकीय खलबते झाली? तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे या पत्रकार परिषदेतून काही मोठे संकेत देणार का? याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे आणि राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे. हेही वाचा.. शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट:फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8 अत्यंत महत्त्वाचे आणि राज्याचा चेहरामोहरा बदलणारे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्राला बळकटी देणे, शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढणे आणि राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करणे हे राज्य सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे, महायुती सरकारने याच धोरणावर भर दिला आहे. विशेषतः शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कर्जमाफीच्या निकषांमध्ये केलेले बदल आणि एसटी महामंडळाच्या जागांचा विकास करण्याचे निर्णय राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरणार आहेत. सविस्तर वाचा..
Source link
राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चा
ब्रेकिंग न्यूज
राजकीय हालचालींना वेग:दिल्लीत एकनाथ शिंदेंची शहांसोबत बैठक, मुंबईत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची फडणवीसांशी चर्चागोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले- थँक्यू, यूपी पोलिस14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना यश मिळेलमल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत आहे, विम्बल्डनच्या फायनलिस्ट याच देशातून होत्याजन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी 8 जोडपी तयार झालीमहिलांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ, कर्ज परतफेडीचा भार होणार हलकाशत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला सरकला, यापूर्वीही असे केले होतेचीनमध्ये भ्रष्टाचारावर मोठी कारवाई:माजी पोलिट ब्युरो सदस्य मा शिंगरुई पक्षातून निष्कासितसोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या वर्षी ₹2.80 लाखांपर्यंत जाऊ शकते
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट!
सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली ! – अनंत विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
फोंडा (गोवा) - कलियुगाच्या आव्हानात्मक काळात केवळ भक्ती असून चालणार नाही,...
आग्रामध्ये परदेशी महिला पर्यटकाची साडी सुटली:महिला शिपायाने साडी नेसण्यास मदत केली, अर्जेंटिनाच्या पर्यटकाने म्हटले-...
आग्रा येथे साडी नेसून ताजमहाल पाहण्यासाठी आलेल्या अर्जेंटिनाच्या महिला पर्यटकाची साडी सुटली. ती वारंवार साडी नेसत होती, पण साडी सुटत होती. यामुळे पर्यटक...
14 जुलैचे राशिभविष्य:वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल, तूळ राशीच्या नोकरदार महिलांना...
14 जुलै, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. कन्या राशीचे लोक व्यवसाय वाढवण्याच्या योजनांवर काम सुरू करू शकतात आणि आर्थिक स्थिती मजबूत...
मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...
मल्टी स्पोर्ट्स संस्कृती, मार्गदर्शन, क्ले कोर्ट प्रशिक्षणाने बनवले सुपरपॉवर:महिला टेनिसवर चेकिया देश राज्य करत...
विम्बल्डन 2026 चा महिला एकेरीचा अंतिम सामना यावेळी खूप खास होता. या वर्षी विजेतेपदाचा सामना चेकिया (चेक रिपब्लिक) च्या दोन स्टार खेळाडू -...
जन्मदर वाढवण्यासाठीची अनोखी मोहीम:बौद्ध भिक्खू तरुणांना लग्नासाठी प्रेरित करत आहेत; डेटिंग रिट्रीटमध्ये 24 तरुणांपैकी...
दक्षिण कोरियामध्ये नोकरीची व्यस्तता, कमी सामाजिक संवाद, एकटेपणा आणि डिजिटल जीवनशैलीने नातेसंबंध निर्माण करण्याच्या संधी कमी केल्या आहेत. विवाह कमी होत आहेत. अशा...
शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला...
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता...
सोने ₹476 ने घसरून ₹1.42 लाखांवर:चांदी ₹849 ने वाढून ₹2.19 लाख प्रति किलोवर, या...
आज म्हणजेच 14 जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव...





























