कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये काल (मंगळवारी) एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळातही उमटू लागले असून, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय? शास्त्रीनगर रुग्णालयातून समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी तीव्र वाद घालताना आणि धक्काबुक्की करताना स्पष्ट दिसत आहेत. वाद सुरू असताना कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर परिस्थितीचे गांभीर्य पाहून फोनवरून कुणाशी तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, संतापलेल्या लोकप्रतिनिधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला डॉक्टरच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून थेट खाली फेकून दिल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संजय राऊतांचा संताप; म्हणाले “चड्डी-बनियानवर वरात काढा!” या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आज ट्विटर एक्स अकाऊंटवरून संताप व्यक्त करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य केले. राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे: “सन्मानीय मुख्यमंत्रीजी आपल्याकडील गृहमंत्री पदाची पूजा घाला! ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी करोना काळात जनतेची सेवा केली, त्या महिला डॉक्टर आणि नर्सना मिंधे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करतात. हे काय कायद्याचे राज्य आहे? या सगळ्यांच्या हातात बेड्या घालून, चड्डी बनियनवर वरात काढा!” ‘सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभणारे आहे का?’; रोहित पवारांचा संतप्त सवाल कल्याणच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टरला झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “एक नगरसेवक येतो आणि महिला डॉक्टरलाच मारहाण करतो, हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभणारे आहे का?” असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने, बाळाच्या सुरक्षेसाठी संबंधित महिलेला तातडीने दुसऱ्या सुसज्ज रुग्णालयात हलवण्याचा प्रामाणिक सल्ला डॉक्टरांनी दिला होता; मग यात त्या डॉक्टरची चूक ती काय? रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप होणे आपण समजू शकतो, परंतु योग्य आणि प्रामाणिक सल्ला देणाऱ्या डॉक्टरलाच मारहाण करणे अजिबात खपवून घेण्यासारखे नाही, अशी स्पष्ट भूमिका रोहित पवार यांनी मांडली. तसेच, महिला डॉक्टर आणि नर्सेसवर हात उचलणाऱ्या या मुजोर नगरसेवकावर तत्काळ गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणीही त्यांनी केली आहे. हेही वाचा.. शिंदेंच्या माजी नगरसेवकाची महिला डॉक्टर अन् नर्सला मारहाण:कल्याणमधील संतापजनक प्रकार, घटनेचे CCTV फुटेज व्हायरल कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील एका महिला डॉक्टर, नर्स आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना थेट मारहाण आणि धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर या मारहाणीचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेचे खळबळजनक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सविस्तर वाचा..
Source link
कल्याण मारहाण प्रकरणी विरोधक आक्रमक:गुंडांची चड्डी-बनियानवर धिंड काढा, राऊतांचा संताप; हे सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभते का? रोहित पवारांचा सवाल
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























