Homeमहाराष्ट्रसाकीनाका मॅनहोल दुर्घटना:महापौरांवरही कारवाई व्हायलाच हवी, सत्ताधाऱ्यांकडून केवळ कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा - आदित्य...

साकीनाका मॅनहोल दुर्घटना:महापौरांवरही कारवाई व्हायलाच हवी, सत्ताधाऱ्यांकडून केवळ कॉन्ट्रॅक्टर्सची सेवा – आदित्य ठाकरे

मुंबईतील साकीनाका येथील मॅनहोल दुर्घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. मुंबईत पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण झाली नसल्यामुळेच अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचा आरोप करत त्यांनी महापौरांवरही निशाणा साधला. “मुंबईच्या महापौरांना मुंबईकरांची नाही, फक्त बांग्लादेशींची काळजी आहे,” अशी जहरी टीका त्यांनी केली. माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, भाजपच्या ताब्यात गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्णपणे फसली आहे. नालेसफाई, कचरा उचलणे, मॅनहोल सुरक्षित करणे आणि पाणी तुंबण्याच्या समस्यांबाबत आपण आणि आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी वारंवार इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. त्यांनी सांगितले की, अनेक वॉर्डांत अजूनही नाल्यांमधील कचरा उचललेला नाही. अंधेरी सबवे, हिंदमाता परिसर आणि इतर ठिकाणी पुन्हा पाणी साचत आहे. यामुळे प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचे दिसून येते. “तिसऱ्यांदा मॅनहोल दुर्घटना” गेल्या दोन दिवसांत मॅनहोलमध्ये पडण्याच्या तिसऱ्या घटनेकडे लक्ष वेधत आदित्य ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी महापौरांच्या उपस्थितीतच महापालिकेचा कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला होता. त्यावेळी त्या कर्मचाऱ्याची विचारपूस करण्याऐवजी त्याच्यावरच चौकशी लावण्यात आली. “मुंबईने अनेक महापौर पाहिले, पण स्वतःच्या कर्मचाऱ्यांवर संशय घेऊन चौकशी लावणारे हे पहिले महापौर असतील,” असा टोला त्यांनी लगावला. “महापौरांना फक्त बांग्लादेशींची काळजी” मुंबईत उघडे मॅनहोल, कचरा आणि पावसाळी संकटांविषयी सोशल मीडियावर सातत्याने तक्रारी येत असतानाही प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईची काळजी या महापौरांना नाही. त्यांना फक्त आणि फक्त बांग्लादेशींची काळजी आहे. हे मुंबईचं दुर्दैव आहे.” “प्रत्येक पावसात नवी दुर्घटना” प्रत्येक पावसाळ्यात मुंबईकरांना वेगवेगळ्या दुर्घटनांचा सामना करावा लागत असल्याचे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. विजेचा धक्का लागून मृत्यू, झाड पडून लहान मुलाचा मृत्यू, मॅनहोलमध्ये पडण्याच्या घटना, अंधेरी सबवेसह अनेक ठिकाणी पाणी तुंबणे अशा या सर्व घटनांमागे प्रशासनाचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप त्यांनी केला. “शिंदेही तेवढेच जबाबदार” आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही लक्ष्य केले. नगरविकास खात्याचे मंत्री असूनही ते सभागृहात उत्तर देण्यासाठी उपस्थित राहत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या मते, सरकारचे लक्ष मुंबईच्या समस्यांकडे नसून आमदार, खासदार आणि नगरसेवक फोडण्याच्या राजकारणात अडकले आहे. “आमदार कसे फोडायचे, खासदार कसे विकत घ्यायचे, कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे कसे काढायचे हे त्यांना माहिती आहे; पण स्वतःच्या खात्याची जबाबदारी पार पाडता येत नाही,” अशी टीका त्यांनी केली. “महापौरांवर कारवाई व्हायलाच हवी” साकीनाका दुर्घटनेप्रकरणी महापौरांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विरोधी पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली, मात्र महापौर घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “महापौर नेमक्या कुठे होत्या, हा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत,” असे ते म्हणाले. झाड पडून झालेल्या मृत्यूचाही मुद्दा उपस्थित दादरमध्ये झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याचा संदर्भ देत आदित्य ठाकरे म्हणाले की, संबंधित झाड धोकादायक असल्याची नोंद आधीच पालिकेच्या अंतर्गत पत्रव्यवहारात होती. तरीही वेळेत कारवाई झाली नाही. त्यांनी आरोप केला की, रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे अनेक झाडांच्या मुळांवर काँक्रीट टाकण्यात आले असून त्यामुळे झाडे अधिक धोकादायक झाली आहेत. “मुंबईची सेवा नाही, कॉन्ट्रॅक्टरांची सेवा” महापालिकेचे सत्ताधारी मुंबईकरांची सेवा करण्याऐवजी कॉन्ट्रॅक्टरांचे हित जपत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या मते, ब्लॅकलिस्ट झालेल्या कंत्राटदारांनाही पुन्हा कामे दिली जात आहेत आणि त्यातूनच मुंबईच्या विकासकामांची गुणवत्ता घसरली आहे. केंद्र सरकारवरही टीका पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी अयोध्या, उज्जैन, नीट परीक्षा, टीईटी, एमपीएससी आदी विविध मुद्द्यांचाही उल्लेख करत भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी समिती नेमण्याची मागणी त्यांनी केली. “भाजपला प्रचार करता येतो, पण प्रशासन चालवता येत नाही” हिंदीत बोलताना त्यांनी भाजपवर आणखी टीका करत म्हटले की, पाऊस हा आनंद घेऊन येतो; मात्र मुंबईत भाजपच्या कारभारामुळे तो भीती घेऊन येत आहे. “भाजपला प्रचार करता येतो, लोकांमध्ये गैरसमज पसरवता येतात; पण प्रशासन चालवता येत नाही. देशात भाजपच्या कारभाराखाली विकसित झालेलं एक तरी शहर दाखवा,” असे खुले आव्हान त्यांनी दिले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव

0
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव; अमोल वानखडे यांना  ‘हिंदुरत्न’, तर प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’       पुणे / सातारा :...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, तर वृश्चिक, मकर राशीच्यांना बढती-नवीन जबाबदारीचे योग

0
बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसमोर पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी येऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी पदोन्नती, नवीन जबाबदारी आणि नवीन नोकरीचे...

मंगळवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या व्यक्तींना प्रमोशन आणि मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू...

0
मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा आर्थिक लाभ...
spot_img

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...

0
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !   पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्‍या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...

देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...

0
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन! नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...
error: Content is protected !!