राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असून, इतर पक्षांतील नेत्यांचा शिवसेनेत येण्याचा ओघ सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार आणि आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर, आता अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनीही शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला आहे. ते आता शिवसेनेचे ‘सहयोगी सदस्य’ म्हणून काम करणार आहेत. आमदार किरण सरनाईक यांचा शिंदेंना पाठिंबा अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेला आपला अधिकृत पाठिंबा जाहीर केला. यावेळी बोलताना सरनाईक म्हणाले की, “ एकनाथ शिंदे आणि महायुती सरकार ज्या वेगाने आणि धडाडीने काम करत आहे, त्या कामाने प्रभावित होऊन मी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.” ‘शिवसेना दिलेला शब्द पाळते’ – एकनाथ शिंदे किरण सरनाईक यांच्या पाठिंब्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. “किरण सरनाईक यांनी राज्यामध्ये शिवसेनेचे काम पाहून सहयोगी सदस्य होण्याचा मार्ग स्वीकारला आहे. महायुती सरकार शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे आणि सरनाईक यांनीही शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शिवसेना दिलेला शब्द पाळते, त्यामुळे शिक्षकांच्या सर्व प्रलंबित मागण्यांकडे विशेष लक्ष दिले जाईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. शिवसेनेच्या ताकदीत वाढ
गेल्या काही दिवसांत शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. आठवडाभरापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील ६ खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर काल ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्याआधी एका अपक्ष आमदारानेही सहयोगी सदस्य म्हणून साथ दिली होती आणि आता किरण सरनाईक यांच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटाचे पारडे अधिकच जड झाले आहे. संबंधित बातमी वाचा., पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव:पक्ष बदलून 24 तासांत अहिर झाले विधान परिषदेचे 17 वे उपसभापती मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे १७ वे उपसभापती म्हणून निवड झाली. उद्धवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरांनी माघार घेतल्याने अहिरांची निवड बिनविरोध झाली. पक्षांतर करून उपसभापतिपद मिळवणारे म्हणून अहिर यांची महाराष्ट्र तसेच विधान परिषदेच्या इतिहासात नोंद झाली आहे. या निवडीच्या निमित्ताने राजकीय टोलेबाजी झाली. सविस्तर वाचा
Source link
शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरूच:6 खासदार, सचिन अहिर यांच्यानंतर आता शिक्षक आमदार किरण सरनाईक शिंदेंसोबत
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























