ओडिशातील जगन्नाथ मंदिरात सोमवारी देवस्नान पौर्णिमा साजरी केली जाईल. विश्वप्रसिद्ध रथयात्रेपूर्वी साजऱ्या होणाऱ्या या उत्सवात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांना स्नान घालण्यात येईल. वर्षभरात ही एकमेव वेळ असते, जेव्हा तिन्ही देवतांना भक्तांसमोर स्नान घालण्यात येते. थंड पाण्याने स्नान केल्यानंतर 15 दिवस दर्शन देत नाहीत भगवान देवाला तीव्र उष्णतेपासून आराम देण्यासाठी थंड पाण्याच्या १०८ घागरींनी स्नान घालण्यात येते. मंदिराच्या उत्तरेला असलेल्या सोन्याच्या विहिरीतून हे पाणी आणले जाते. अशी मान्यता आहे की, या शाही स्नान समारंभामुळे तिन्ही देव आजारी पडतात आणि १५ दिवस सार्वजनिक दर्शनापासून दूर राहतात. या कालावधीला ‘अनावसर’ काळ म्हटले जाते. हा ज्येष्ठ पौर्णिमेपासून आषाढ अमावस्येपर्यंत चालतो. या दिवसांमध्ये देव भक्तांना दर्शन देत नाहीत. त्यामुळे पर्यायी प्रतिमांच्या रूपात मंदिरात भगवान जगन्नाथ, देवी सुभद्रा आणि भगवान बलभद्र यांच्या पट्टचित्रांची पूजा केली जाते. या चित्रांनाच दर्शनासाठी ठेवले जाते. १५ दिवसांनंतर देव ‘नवयौवन रूपात’ दर्शन देतात. आवाजावर असते बंदी, मंदिरात घंटाही वाजवली जात नाही परंपरेनुसार, आजारी देवतांना राज वैद्यांच्या देखरेखीखाली एकांत कक्षात ठेवले जाते. असे म्हटले जाते की राज वैद्यांच्या आयुर्वेदिक औषधाने (पंचन) देवता दोन आठवड्यांत बरे होतात. आवाजामुळे देवाला त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात घंटाही वाजवली जात नाही. या काळात मंदिरात कोणतेही बांधकाम केले जात नाही. स्नान पर्वाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पुरीमध्ये 3 ते 4 लाख भाविक पोहोचू शकतात. पुरी शहरात 79 प्लाटून पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. राजा इंद्रद्युम्नने सोन्याच्या विटा लावल्या, म्हणूनच आहे सोन्याची विहीर सोन्याची विहीर मंदिर परिसरात आहे. ती वर्षातून एकदा ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशीच उघडली जाते. तिची देखरेख करणारे सुना गोसाईं यांच्या मते, खोली कोणालाही माहीत नाही. पण विहिरीची रुंदी 4-5 चौरस फूट आहे. विहिरीच्या आतल्या भिंतींवर मंदिराचे संस्थापक राजा इंद्रद्युम्न यांनी सोन्याच्या विटा लावल्या होत्या. तिच्यावर 2 टनांचे लोखंडी झाकण आहे. त्यामुळे ते 15 ते 17 सेवक मिळून उचलतात. पितळेच्या 108 घागरींमध्ये पाणी भरले जाते. जगन्नाथजींना 35, बलभद्रजींना 33 आणि सुभद्राजींना 22 घड्यांनी स्नान घालतात श्री मंदिराच्या परंपरेनुसार, देवाला 108 घड्यांमध्ये स्नान घालण्यात येते. जगन्नाथजींना 35, बलभद्रजींना 33, सुभद्राजींना 22 आणि सुदर्शनजींना 18 घड्यांनी स्नान घालण्यात येते. जगन्नाथजींचे वरिष्ठ सेवायत डॉ. शरत चंद्र मोहंती यांच्या मते, जलाभिषेकाचा क्रम देखील वेगळा असतो. सर्वात आधी सुदर्शनजींना, त्यानंतर बलभद्रजींना, सुभद्राजींना आणि शेवटी जगन्नाथजींना स्नान घालण्यात येते. माहितीनुसार, या वर्षी रथयात्रा 16 जुलै रोजी निघेल.
Source link
पुरीमध्ये भगवान जगन्नाथ 15 दिवस आजारी राहतील:आज सोन्याच्या विहिरीतून 108 घागरी पवित्र जल आणणार, महास्नानाने रथयात्रा उत्सवाला सुरुवात होईल
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव
हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा गौरव; अमोल वानखडे यांना ‘हिंदुरत्न’, तर प्रा. (सौ.) भक्ती डाफळे यांना ‘नवदुर्गा सन्मान’
पुणे / सातारा :...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, तर वृश्चिक, मकर राशीच्यांना बढती-नवीन जबाबदारीचे योग
बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीच्या व्यक्तींसमोर पदोन्नती किंवा नवीन नोकरीच्या संधी येऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी पदोन्नती, नवीन जबाबदारी आणि नवीन नोकरीचे...
मंगळवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या व्यक्तींना प्रमोशन आणि मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळू...
मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी सिंह राशीच्या लोकांना पदोन्नती किंवा पुरस्कार मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. मीन राशीच्या लोकांना नवीन नोकरी, पदोन्नती किंवा आर्थिक लाभ...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अध्यात्मिक आणि राष्ट्र धर्म...
घटस्थापनेच्या दिवसापासून चतुःश्रृंगी मंदिर (पुणे) आणि भवानी माता मंदिर (आकुर्डी) येथे भव्य प्रदर्शन कक्ष !
पुणे - महिषासुराच्या नाशासाठी अवतार घेणार्या श्री दुर्गादेवीचा उत्सव म्हणजे...
देवीची उपासना करत स्वतःतील शक्ती जागवा आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या ! – हिंदु जनजागृती...
नवरात्रोत्सवानिमित्त हिंदु युवतींसाठी ‘मैं हूँ दुर्गा’ अभियान; हिंदु युवतींसाठी देशभरात
अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गांचे आयोजन!
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ‘मैं हूँ दुर्गा’ अभियानाचे...

























