ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज थेट मैदानात उतरले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आजपासून उद्धव ठाकरेंच्या तोफ धडाडणार असून, त्यांच्या विदर्भ दौऱ्याची पहिली जाहीर सभा आज सकाळी १० वाजता यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर होत आहे. या सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. बंडखोरांना उत्तर आणि पुढील रणनीती
यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे या सभेत बंडखोरांवर काय बोलणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. सभेच्या पूर्वसंध्येलाच उद्धव ठाकरे यांचे यवतमाळात आगमन झाले. या सभेत ते पक्षाची पुढील भूमिका आणि आगामी निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. नेत्यांची मोठी फौज मैदानात
या जाहीर सभेसाठी ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत आणि अनिल देसाई यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते यवतमाळात दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शिवसैनिक मोठ्या संख्येने सभेसाठी येत असून कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मोठी गर्दी करत आहे. सलग सभांचा धडाका यवतमाळच्या या सभेनंतर उद्धव ठाकरे सलग वाशीम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी येथे देखील अशाच सभा घेणार आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेल्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तास महत्त्वाचे:पुणे, कोकणसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पुण्यासहित राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. शनिवार आणि रविवारी (२७ व २८ जून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक असेल, असा अंदाज वर्तवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा
Source link
खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे मैदानात:यवतमाळातून आज विदर्भ दौऱ्याची सुरुवात; बंडखोरांना काय उत्तर देणार? राज्याचे लक्ष
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...
बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...
सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























