Homeमहाराष्ट्रधारणीच्या सुसर्दा येथील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू:आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा, ऑगस्टपासून नवीन...

धारणीच्या सुसर्दा येथील आयटीआयची प्रवेश प्रक्रिया सुरू:आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा, ऑगस्टपासून नवीन सत्र

धारणी तालुक्यातील सुसर्दा येथील शासकीय आदिवासी आश्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणाऱ्या नवीन सत्रासाठी ही ऑनलाईन प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ही संस्था केवळ आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा म्हणून कार्यरत आहे. ‘यावे प्रशिक्षणासाठी – निघावे स्वयंरोजगारासाठी’ या ब्रीदवाक्याला अनुसरून, विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक व बिगर-तांत्रिक व्यवसायांमध्ये दर्जेदार प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगार आणि नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा उद्देश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि विशेषतः आदिवासी भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या रोजगाराभिमुख तांत्रिक प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवेश प्रक्रियेत इंजिनिअरिंग अंतर्गत दोन वर्षांचे दोन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ‘फिटर’ (२० जागा) आणि ‘यांत्रिक मोटार गाडी – मेकॅनिक मोटर व्हेईकल’ (२४ जागा) हे अभ्यासक्रम मुले व मुली दोघांसाठी खुले आहेत. याव्यतिरिक्त, आठवी किंवा दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा ‘वेल्डर’ कोर्स (२० जागा) उपलब्ध आहे. मुलींसाठी विशेष असलेला एक वर्षाचा ‘स्युवींग टेक्नॉलॉजी’ हा नॉन-इंजिनिअरिंग कोर्स (२० जागा) देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व व्यवसायांसाठी ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी शासनाच्या या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

टीएमसी समांतर समिती स्थापन; अरुप रॉय अध्यक्ष; ऋतब्रता भट्टाचार्यांचे ममता बान यांना आव्हान

0
मराठी बातम्याराष्ट्रीयटीएमसी समांतर समिती स्थापन; अरुप रॉय अध्यक्ष; ऋतब्रत भट्टाचार्यांचे ममता बान यांना आव्हानकोलकाता6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराविधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेस (टीएमसी)...

लखनऊमधील कोचिंगमध्ये ऑटोमॅटिक गेटमुळे 15 जणांचा मृत्यू:एकाच जिन्याने येण्या-जाण्याचा मार्ग; निवासी इमारतीला व्यावसायिक बनवले...

0
लखनऊ कोचिंग अग्निकांडात 15 लोकांचा बळी गेला. मरण पावलेल्यांमध्ये बहुतेक विद्यार्थी होते. हे लोक गेमिंग आणि ॲनिमेशन शिकण्यासाठी येत होते. ज्यावेळी अपघात झाला,...

संताची दुःखी व्यक्तीला शिकवण:यश तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपली ऊर्जा विखुरण्याऐवजी एका दिशेने लावतो

0
फार पूर्वीच्या काळी एक माणूस गरिबीमुळे खूप दुःखी होता. त्याच्याकडे चांगले घर नव्हते, पुरेसे अन्न नव्हते आणि जीवनात कोणतीही स्थिरता नव्हती. तो नेहमी...

उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...

0
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...
spot_img

उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...

0
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...

विचार सकारात्मक ठेवा, म्हातारपणाची जाणीव होणार नाही:जगप्रसिद्ध पुस्तक ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माइंड’...

0
वाढत्या वयातही मन तरुण ठेवता येते का? सकारात्मक विचार खरोखरच जीवनात फरक घडवू शकतात का? जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक असलेल्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी...

0
हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते....

मोटोरोला एज 70 फ्युजनचे नवीन व्हेरिएंट लॉन्च:स्मार्टफोनमध्ये 50MP सोनी कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी, मिलिटरी...

0
टेक कंपनी मोटोरोलाने मार्चमध्ये एज 70 फ्युजन लॉन्च केले होते, आज कंपनीने त्याचे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज असलेले नवीन व्हेरिएंट लॉन्च केले...
error: Content is protected !!