Homeदेश-विदेश२१ जून रोजी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दीन निमित्त विशेष लेख!

२१ जून रोजी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दीन निमित्त विशेष लेख!

सूर्य नमस्कार: १२ सोप्या मुद्रा ज्या कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतात!

दररोज सकाळी लाखो लोक योगाभ्यासाचा एक भाग म्हणून सूर्य नमस्कार घालतात. परंतु हा प्राचीन व्यायाम प्रकार केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यापुरताच मर्यादित आहे का?

शास्त्र काय सांगते?

योगशास्त्र आणि आयुर्वेद यांनुसार, सूर्य नमस्काराच्या वेळी शरीराची पुढे-मागे हाेणारी हालचाल, लयबद्ध श्वासोच्छ्वास आणि मंत्रांचा उच्चार—या सर्वांमुळे शरीरातील ‘कुंडलिनी चक्रे’ सक्रिय आणि संतुलित होतात. इतकेच नाही तर, हे पाठीच्या कण्याच्या मुळाशी असलेली सुप्त ‘कुंडलिनी शक्ती’ जागृत करून तिला ‘सुषुम्ना नाडी’ द्वारे वरच्या दिशेने नेण्यास मदत करते, ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.

प्राचीन ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम

नुकतेच महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (MAV) च्या संशोधन गटाने सूर्य नमस्काराच्या कुंडलिनी चक्रांवरील परिणामाचा अभ्यास कऱण्यासाठी एक प्रयोग केला.

यासाठी रशियन शास्त्रज्ञ डॉ. कॉन्स्टँटिन कोरोटकोव्ह आणि त्यांच्या गटाने विकसित केलेल्या ‘बायो-वेल जीडीवी’ (गॅस डिस्चार्ज व्हिज्युअलायझेशन) उपकरणाचा वापर केला. हे उपकरण व्यक्तीच्या बोटांमधून निघणारे सूक्ष्म प्रकाश कण (फोटॉन) ग्रहण करून त्याच्या ऊर्जा क्षेत्राचे (Energy field) आणि चक्रांच्या स्थितीचे विश्लेषण करते.

हा प्रयोग MAV चे एक साधक डॉ. भिकाजी भोसले (वय ७० वर्षे) यांच्यावर करण्यात आला. त्यांनी सूर्याच्या बारा पारंपरिक नावांच्या उच्चारासह सूर्य नमस्काराची १२ आवर्तने करण्यापूर्वी (चित्र १) आणि केल्यानंतरच्या (चित्र २) नोंदी (रीडिंग) घेण्यात आल्या. या नोंदी उपकरणातून मिळालेल्या पुढील २ कुंडलिनी चक्रांच्या चित्रांमधून लक्षात घेऊ शकतो.

सूर्य नमस्कारा नंतर चक्रांमधे दिसून आलेले उल्लेखनीय बदल

सहा चक्रांचा आकार वाढला: सूर्य नमस्कार घातल्यानंतर त्यांच्या कुंडलिनी चक्रांना ऊर्जा प्राप्त झाली आणि ती अधिक प्रभावीपणे कार्य करण्यास सक्षम झाली.

चार चक्रे सुषुम्ना नाडीच्या लगत आली: याव‍रून चक्रांची ईश्वरी तत्त्व ग्रहण करण्याची क्षमता वाढली, हे लक्षात येते.

तीन चक्रे निष्क्रिय झाली: हे अंतर्मुखता वाढल्याचे दर्शवते, जे ‘मनोलय’ हाेण्यास मदत करते.

विशुद्ध चक्राच्या आकारात थोडी घट दिसून आली: डॉ. भोसले यांनी सूर्य मंत्रांचा तोंडाने उच्चार केला होता. वाणी विशुद्ध चक्राशी संबंधित असल्याने, या चक्रावर सर्वाधिक आध्यात्मिक उपाय (Spiritual healing) झाले, ज्यामुळे त्यामध्ये साठलेली त्रासदायक ऊर्जा कमी झाली.

‍एक सोपा; परंतु शक्तिशाली सर्वंकष व्यायाम प्रकार !

सूर्य नमस्काराचा प्रभाव केवळ शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यापुरताच मर्यादित नाही, तर ही एक सूक्ष्म वैज्ञानिक प्रक्रिया आहे जी तुमची कुंडलिनी शक्ती सक्रिय आणि संतुलित करू शकते. ताणतणाव, चिंता आणि हानिकारक किरणोत्सर्गाच्या या युगात, हा प्राचीन योग प्रकार जीवनाला दैवी ऊर्जेने भारीत करण्यासाठी एक सोपा, पण शक्तिशाली उपाय आहे, हे या प्रयोगातून स्पष्ट झाले.

या आंतरराष्ट्रीय योगदिनी, सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपण दररोज वैश्विक आध्यात्मिक सकारात्मक ऊर्जेशी जोडले जाण्याचा संकल्प करूया! 

संकलक : डॉ. (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

स्थानिक संपर्क :७०३८७१३८८३

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

शनिवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते, पैसे गुंतवण्यासाठी कन्या राशीच्या...

0
शनिवार, 1 ऑगस्ट रोजी मेष राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये मोठी झेप घेण्याचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांना नोकरी बदलण्याचा चांगला प्रस्ताव मिळू शकतो. मिथुन...

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!

0
आगामी आपत्काळातून तारण्यासाठी आणि ‘रामराज्या’साठी साधनेला पर्याय नाही - श्री चैतन्य तागडे पुणे - संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या महायुद्धाचे संकट, वाढती महागाई आणि नैराश्य यांवर...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:आपण अशा पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे जी सत्य आणि धर्माच्या...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांचा आपण अभ्यास केला पाहिजे.हरिद्वार17...
spot_img

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

Hyundai Naira इलेक्ट्रिक MPV संकल्पना GIIAS 2026 मध्ये अनावरण करण्यात आली

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराइंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या GIIAS 2026 इव्हेंटमध्ये हुंडईने आपली नवीन नेइरा कॉन्सेप्ट सादर केली आहे. ही एक इलेक्ट्रिक MPV आहे, जी...
error: Content is protected !!