Homeपुणे / पिंपरी-चिंचवडहिंदु जनजागृती समितिची निवेदनाद्वारे मागणी !

हिंदु जनजागृती समितिची निवेदनाद्वारे मागणी !

हिंदूंच्या धार्मिक परंपरेवर गदा आणणारा पुरातत्व विभागाचा ‘तुघलकी’ निर्णय तत्काळ रद्द करा !

पुणे : गंज पेठेतील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ स्मारकासमोरील वटवृक्षाच्या पूजनावर पुरातत्व विभागाने घातलेली बंदी हा हिंदू महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर केलेला मोठा आघात आहे. या अन्यायकारक निर्णयाचा “हिंदु जनजागृती समितीने” तीव्र निषेध केला असून, पुरातत्व विभाग आणि मनपा आयुक्त कार्यालयात निवेदन देऊन ही बंदी उठवण्याची मागणी केली आहे. हे निवेदन हिंदुराष्ट्र समन्वय समिती, सुराज्य अभियान,

रणरागिणी शाखा यांच्या शिष्ठमंडळाने दिले. यावेळी हिंदुराष्ट्र समन्वय समितीचे श्री. सचिन घुले, रणरागिणी शाखेच्या कु.क्रांती पेटकर, सुराज्य अभियानचे सुरेंद्र महाजन, हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील तसेच अन्य संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

    ‘या विषयासंदर्भात दोन्ही विचारांच्या संघटनांची निवेदने आलेली आहेत. त्यातील सूत्रे आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवतो. या संदर्भात अजून अंतिम निर्णय झालेला नाही. दोन्ही बाजूंचा सविस्तर विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल’, असे पुरातत्व विभागाचे श्री. हेमंत गोसावी यांनी सांगितले. 

निवेदनातील ठळक मुद्दे ! 

निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधानाचे अनुच्छेद २५ आणि २६ प्रत्येक नागरिकाला आपापल्या धर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली वटपौर्णिमेची परंपरा रोखणे हे या मूलभूत अधिकारांचे उघड उल्लंघन आहे. राज्यातील गड-किल्ले आणि संरक्षित स्मारकांवर झालेली अनधिकृत मजार, थडगी आणि बांधकामे हटवण्याबाबत पुरातत्व विभाग पूर्णतः निष्क्रीय आहे. मात्र, परंपरेने आणि शांततेत चालणाऱ्या हिंदूंच्या पूजेला विरोध करण्यासाठी हा विभाग कमालीची तत्परता दाखवत आहे. हा प्रशासनाचा उघड दुजाभाव आहे. केवळ झाडाला प्रदक्षिणा घातल्याने ऐतिहासिक वास्तूला हानी पोहोचते, असा कोणताही तांत्रिक आधार किंवा अहवाल पुरातत्व विभागाकडे नाही. असे असताना अशा प्रकारे सणांवर बंदी घालणे हे लोकशाहीला घातक आहे.

   ज्यांनी महिलांच्या सन्मानासाठी आयुष्य वेचले, त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याच स्मारकासमोर महिलांना पूजेपासून रोखणे, हा त्यांच्या महान कार्याचा अपमान आहे. पुरातत्व विभाग आपल्या मूळ जबाबदाऱ्या (स्मारकांचे जतन) सोडून धार्मिक विधींमध्ये अडथळे आणण्याचे काम करत आहे.

निवेदनाद्वारे समितीने केलेल्या प्रमुख मागण्या

१. वटपौर्णिमा पूजनावर बंदी घालणारा आदेश प्रशासनाने कोणत्याही अटीविना त्वरित मागे घ्यावा.

२. येत्या २९ जून २०२६ रोजी महिलांना वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी रीतसर परवानगी द्यावी.

३. पूजेच्या वेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करावा.

या संदर्भात प्रशासनाने योग्य पावले न उचलल्यास, हिंदु जनजागृती समिती समस्त भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना सोबत घेऊन राज्यव्यापी आंदोलन छेडेल, असा इशारा समितीने दिला आहे.

 

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

२१ जून रोजी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दीन निमित्त विशेष लेख!

0
सूर्य नमस्कार: १२ सोप्या मुद्रा ज्या कुंडलिनी शक्ती जागृत करू शकतात! दररोज सकाळी लाखो लोक योगाभ्यासाचा एक भाग म्हणून सूर्य नमस्कार घालतात. परंतु हा प्राचीन...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या धर्मांतरितांच्या ‘शुद्धीकरणा’स ३५० वर्षे पूर्ण!

0
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा!  - हिंदु जनजागृती समितीचे सर्व हिंदु संघटनांना आवाहन   हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे...
spot_img

पालकत्व- मुलाची उंची कमी आहे:वयानुसार त्याला लाज वाटू लागली, खोलीत बंद राहतो, लोकांशी मिसळत...

0
प्रश्न- माझ्या मुलाचे वय १७ वर्षे आहे. त्याची उंची त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या तुलनेत कमी आहे. आम्ही सर्व प्रयत्न केले, डॉक्टरांना दाखवले, पण...

आलिया भट्टने मुलगी राहाला फिल्मी म्हटले:म्हणाली- तिला नृत्य आणि गाणी खूप आवडतात, ती स्टेजसाठीच...

0
अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच अमृत रत्न समिटमध्ये तिच्या बालपणाबद्दल आणि मुलगी राहाबद्दल मनमोकळेपणाने सांगितले आहे. आलियाने सांगितले की लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती...

1 जुलै 2026 पासून Tata Motors CV किमतीत 2.5% वाढ

0
नवी दिल्ली3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराटाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 2.5% पर्यंत वाढ जाहीर केली आहे. नवीन दर 1 जुलैपासून लागू होतील. चालू...

ऑटो चेक क्लिअरिंगमध्ये फसवणूक; केमिकलने नावे मिटवत आहेत:जलद क्लिअरिंग प्रणालीमध्ये मोठी त्रुटी, रंग आणि...

0
अमेरिकेत जुन्या काळातील एक घोटाळा नव्या आणि धोकादायक स्वरूपात परत आला आहे. फसवणूक करणारे रसायनांचा वापर करून चेकवरील नाव आणि रक्कम मिटवून ते...
error: Content is protected !!