मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन कडाडून टीका केली आहे. “इतर मागासवर्गीय (OBC) समाजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सवलती देण्याचा शासनाचा निर्णय असंवैधानिक असून, ही सरकारची वैचारिक दिवाळखोरी आहे. सरकार मनोज जरांगेंसमोर लाचार झाले असून, झुंडशाहीला बळी पडले,” असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच या निर्णयाविरोधात आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशाराही हाके यांनी सरकारला दिला. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील समाजांप्रमाणे विविध शासकीय योजना आणि सुविधा मिळाव्यात यासाठी मनोज जरांगे यांनी मोठा लढा उभारला होता. अंतरवाली सराटी येथे त्यांनी केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने अनेक मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली. नुकत्याच काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार मराठा समाजाला ओबीसी समाजाप्रमाणे विविध लाभ देण्याचा मार्ग खुला झाला आहे. हा निर्णय मराठा समाजासाठी ऐतिहासिक असल्याची भावना समाजातील विविध स्तरांतून व्यक्त केली जात आहे. मात्र, याच निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सरकारवर टीका केलीये. नेमके काय म्हणाले लक्ष्मण हाके? पत्रकार परिषदेत बोलताना लक्ष्मण हाके यांनी सरकारच्या हेतूवर अनेक प्रश्न उपस्थित केले. “ओबीसी समाजाला ज्या योजना दिल्या आहेत त्या अभ्यासपूर्ण आहेत. मात्र, त्याच योजना मराठा समाजासाठी लागू करताना कोणते निकष लावले गेले? कुठल्या समितीच्या शिफारशीनुसार हा निर्णय झाला? याचे लॉजिक सरकारने स्पष्ट करावे,” अशी मागणी त्यांनी केली. “हे सरकार झुंडशाहीला बळी पडले असून, मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर लाचार झाले आहे. कोणीतरी आंदोलनाला बसले म्हणून सरकार असे निर्णय घेऊन भीक घालत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी विचारला. अनेक महामंडळांना अपुरा निधी असताना मराठा समाजाला मोठा निधी दिला जात असल्याचा आरोप करत, “ओबीसींना सरकारने आतापर्यंत काय दिले, याची श्वेतपत्रिका जाहीर करावी,” अशी मागणी त्यांनी केली. ओबीसी समाजात तीव्र असंतोष या निर्णयामुळे ओबीसी समाजात सरकारच्या धोरणांबद्दल प्रचंड चीड आणि नाराजी असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले. “शासन आम्हाला जाणीवपूर्वक बेदखल करत आहे. आम्ही आमचा रोष कशा प्रकारे व्यक्त करू, हे येणाऱ्या काळात सरकारला समजेलच,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच या निर्णयातून सरकारने मराठा समाजाचीही फसवणूक केल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसी नेत्यांना हाकेंचे आव्हान ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असतानाही महाराष्ट्रातील एकही मोठा नेता यावर बोलायला तयार नाही, याबद्दल खंत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली. लक्ष्मण हाके यांनी थेट नाव घेत राज्यातील बड्या नेत्यांना आव्हान दिले. “चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ, गणेश नाईक, पंकजा मुंडे, संजय राठोड, गुलाबराव पाटील… तुम्ही ओबीसींच्या प्रश्नांवर बोलणार आहात की नाही? हे एकदा स्पष्ट करा. जर तुम्ही बोलणार नसाल, तर स्वतःला ओबीसी नेते म्हणवून घेणे बंद करा,” असे लक्ष्मण हाके म्हणाले. राज्यातील ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन या अन्यायाविरोधात सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Source link
मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती देण्याचा निर्णय असंवैधानिक:सरकार मनोज जरांगे समोर लाचार – लक्ष्मण हाके
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा!
श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...
गणपतीला लाल फुल का वाहतात ?
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते?
हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले.
या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला.
सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले.
निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले.
संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गिक 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते.
त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा!
‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
गणेशोत्सवातील आवाढव्य मूर्ती : उंची मूर्तींची हवी कि भक्तीची?
गणेशोत्सव हा केवळ एक सण नसून देशाचा सर्वात मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आनंद सोहळा आहे. संपूर्ण...
गणेशोत्सव निमित्त विशेष लेख
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व
गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...
श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा
पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...
शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...
राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...
पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...

























