प्रतिनिधी |पैठण शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली निष्ठा आणि समाजाभिमुख उपक्रमांमधील सक्रिय सहभाग याची दखल घेत शिक्षिका अर्चना वसंत गिरवलकर यांना यंदाचा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अर्चना गिरवलकर यांनी सांगितले की, हा पुरस्कार केवळ सन्मान नाही, तर समाजाप्रती आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या निष्ठेची पावती आहे. यावेळी पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, नगराध्यक्ष विद्या कावसनकर, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच समितीचे अध्यक्ष डॉ. भरत झारगड, पंचायत समिती सदस्य दादासाहेब गलांडे आणि डॉ. सखु झारगड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. अर्चना गिरवलकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले समर्पित कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले परिश्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केलेले योगदान यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाईचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष ज्योतीताई ठाकूर, कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, विद्यासभा अध्यक्ष डॉ. जयंत जोशी, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. पद्मकुमार कासलीवाल, कार्यवाह जुगलकिशोर लोहिया, शिवाजी मारवाडी, नंदकिशोर मालाणी, डॉ. राम लोंढे, मनोज शुक्ल, विजय चाटुपळे, किशोर भाकरे, विजय पापडीवाल, रविंद्र साळजोशी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी आणि माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आदर्श शिक्षक पुरस्कार खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते अर्चना गिरवलकर यांना देण्यात आला.
Source link
अहिल्यादेवी होळकर शिक्षक आदर्श पुरस्काराने अर्चना गिरवलकर सन्मानित:शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे पुरस्कारासाठी झाली निवड
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
‘कॉकरोच जनता पार्टी’चे दिल्लीत जोरदार आंदोलन:CM फडणवीसांची ‘अराजकता’ म्हणत टीका, तर ठाकरेंचा सरकारला इशारा
सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना आकर्षित करणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी'ने (CJP) आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर थेट रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. या...
गांगुली म्हणाले- मी युसूफ पठाण यांना खासदारकी सोडायला सांगितले नाही:मला राजकारणात रस नाही, दावा-...
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, मी ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यास...
6 जूनचे राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कुंभ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे स्रोत...
शनिवार, 6 जून रोजी मेष राशीचे लोक प्रॉपर्टी किंवा गाडी खरेदी-विक्री करण्याचा विचार करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांना व्यवसायात महत्त्वाचे ऑर्डर मिळण्याची शक्यता...
कर्णधार म्हणून गिलच्या दुसऱ्या सर्वात जलद हजार धावा:पंत 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा भारतीय...
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 85 षटकांत 3 गडी गमावून 368 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल...
कर्णधार म्हणून गिलच्या दुसऱ्या सर्वात जलद हजार धावा:पंत 50 कसोटी सामने खेळणारा तिसरा भारतीय...
भारत-अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने 85 षटकांत 3 गडी गमावून 368 धावा केल्या. भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर केएल...
कंट्री काउंटर्स; जगातील सर्व देश फिरण्याचा ट्रेंड:गर्दीला कंटाळलेले लोक अस्पर्शित ठिकाणांकडे वळत आहेत, तज्ज्ञ...
प्रशांत महासागरातील छोटासा बेट असलेला देश ‘तुवालु’... हवाई आणि ऑस्ट्रेलियाच्या मध्ये वसलेला हा देश जगातील त्या मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे, जिथे वर्षभरात एखादाच...
शिल्पा शिंदेवर कायदेशीर कारवाईची CM फडणवीसांकडे मागणी:निर्मात्यावर लैंगिक छळाचे खोटे आरोप केले; शिल्पाची पोस्ट-...
टेलिव्हिजन अभिनेत्री शिल्पा शिंदेच्या एका अलीकडील खुलाश्यावर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिल्पाने कॉमेडियन भारती सिंग आणि...
दिल्ली E85 फ्लेक्स इंधन लाँच
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करा85% इथेनॉल मिश्रित E85 इंधन दिल्लीत अधिकृतपणे लॉन्च झाले आहे. विशेष म्हणजे, हे दिल्लीत विकल्या जाणाऱ्या E20 पेट्रोलपेक्षा ₹20...
































