Homeमहाराष्ट्रविष्णुनगर -हनुमाननगर दरम्यानचा शिवरस्ता खुला:15 वर्षांपासून बंद हाेता 1700 फूटांचा शिवरस्ता; शेतकऱ्यांचा...

विष्णुनगर -हनुमाननगर दरम्यानचा शिवरस्ता खुला:15 वर्षांपासून बंद हाेता 1700 फूटांचा शिवरस्ता; शेतकऱ्यांचा वाहतुकीचा प्रश्न मार्गी‎

तालुक्यातील विष्णुनगर ते हनुमाननगर दरम्यानचा गेल्या सुमारे १५ वर्षांपासून बंद असलेला १७०० फूट लांबीचा आणि १८ फूट रुंदीचा महत्त्वाचा शिवरस्ता महसूल व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर मोकळा करण्यात आला आहे. रस्ता खुला झाल्याने परिसरातील शे

.

गाव नकाशात तुटक रेषेने दर्शविलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमालाची ने-आण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या कारवाईस उपअधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र भाबड, लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक दीपक पाटील आणि महसूल सहायक शरद घाटगे यांचे विशेष सहकार्य लाभले. मंगळवारी (दि. २६) विंचूरचे मंडळ अधिकारी संतोष डुंबरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांना रस्त्याचे कायदेशीर तसेच व्यावहारिक महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाने रस्त्याची मोजणी करून हद्दीच्या खुणा निश्चित केल्या. प्रशासनाचा सकारात्मक दृष्टिकोन आणि गावकऱ्यांच्या समजूतदारपणामुळे कोणताही वाद न होता लोकसमजुतीने हा शिवरस्ता पूर्णपणे खुला करण्यात आला. रस्ता खुला झाल्याने विष्णुनगर आणि हनुमाननगर परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतूक, शेतीची मशागतीची कामे आणि दैनंदिन ये-जा अधिक सुलभ होणार आहे.

हा जुना शिवरस्ता कायदेशीर आणि शांततापूर्ण मार्गाने खुला करण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी शुभम पाटसकर यांच्यासह स्थानिक शेतकरी बांधवांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. महसूल, भूमी अभिलेख आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न यावेळी निर्माण झाला नाही.

विष्णुनगर ते हनुमाननगर दरम्यानचा गाव नकाशात तुटक रेषेने दर्शविलेला शिवरस्ता अनेक वर्षांपासून बंद होता. शेतकऱ्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत असल्याने त्यांचा वेळ आणि खर्च वाढत होता. उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, भूमी अभिलेख आणि पोलिस प्रशासनाने समन्वय साधून प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर मोजणी करून रस्त्याच्या हद्दी निश्चित करण्यात आल्या.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘गुलाबी आंखें…’ ते ‘जिंदगी कैसी है पहेली…’:नितीन गडकरी- देवेंद्र फडणवीसांच्या सुरेल गायनाने जिंकली नागपूरकरांची...

0
नागपूर येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा आज अत्यंत दिमाखदार सोहळ्यात समारोप पार पडला. या विशेष कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री...

अयोध्या राम मंदिरातून 7 कोटींच्या चोरीचा दावा:अखिलेश म्हणाले- सरकारचे मौन संशयास्पद; माजी मंत्री म्हणाले-...

0
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आरोप आहे की, अयोध्या राम मंदिरात आलेल्या देणग्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची चोरी झाली आहे. त्यांनी रविवारी दुपारी X पोस्ट...

Taurus Property Deal Gains, Virgo Income Source Resumes

0
7 दिवसांपूर्वीकॉपी लिंक1 जून, सोमवार रोजी मेष राशीच्या लोकांना सरकारी संस्थांकडून मोठी ऑर्डर मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मालमत्तेच्या व्यवहारात फायदेशीर करार मिळण्याची...

वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील

0
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...
spot_img

वैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड-आयर्लंड सहलीत सामील

0
मराठी बातम्याखेळवैभव सनशाईनचा यंगेस्ट डेब्यू रेकॉर्ड; पालक इंग्लंड आयर्लंड ट्रिप मध्ये सामीलक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचे आई-वडीलही इंग्लंड आणि आयर्लंडला...

पुरुष आता कुटुंबाला जास्त वेळ देत आहेत:अमेरिकेत यासाठी 30% कमी पगाराची नोकरीही मान्य, भारतातही...

0
अमेरिकेतील पदवीधर नोकरदार वडील आता करिअरमध्ये पुढे जाण्याऐवजी किंवा जास्त कमावण्याऐवजी आपल्या कुटुंबाला प्राधान्य देत आहेत. थिंक टँक अमेरिकन इन्स्टिट्यूट फॉर बॉईज अँड...

जान्हवी कपूरच्या समर्थनार्थ आल्या साउथ अभिनेत्री:म्हणाल्या- ‘पेड्डी’ वादामध्ये अभिनेत्रीला नाही, निर्मात्यांना जबाबदार धरावे; मेकअप...

0
अभिनेत्री जान्हवी कपूरच्या 'पेड्डी' या चित्रपटातील तिच्या भूमिकेला गरजेपेक्षा जास्त बोल्ड दाखवल्याबद्दल वाद वाढत आहे. मात्र, आता जान्हवीच्या समर्थनार्थ तिची मेकअप आर्टिस्ट सवलिन...

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर हवेची गळती:आपत्कालीन स्थितीत अंतराळवीरांना परत आणण्याची तयारी, नासाने चारही अंतराळवीरांना स्पेस...

0
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) च्या रशियन भागात हवा गळती (एअर लीक) वाढल्यानंतर नासाने तेथे असलेल्या अंतराळवीरांना त्यांच्या स्पेसक्राफ्टमध्ये लपून बसण्यास आणि संभाव्य सुरक्षित...
error: Content is protected !!