संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित ‘संसद रत्न’ पुरस्कार २०२६ ची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून, राज्यातील पाच खासदारांना या बहुमानाने गौरवण्यात येणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेल्या एकूण १२ खासदारांपैकी ५ खासदार महाराष्ट्रातील आहेत, ही राज्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये लोकसभेतील चार आणि राज्यसभेतील एका खासदाराचा समावेश आहे. यात वैयक्तिक श्रेणीमध्ये डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे (कल्याण) यांची निवड झाली आहे. त्यांच्यासह नरेश गणपत म्हस्के (ठाणे), डॉ. हेमंत विष्णू सावरा (पालघर), स्मिता उदय वाघ (जळगाव) आणि राज्यसभेतील पुण्याच्या खासदार डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये दोन महिला खासदारांचा समावेश असल्याने राज्याच्या स्त्री-शक्तीचाही गौरव झाला आहे. देशभरातील अन्य विजेते देशभरातून या पुरस्कारासाठी एकूण १२ खासदारांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये जगदंबिका पाल (उत्तर प्रदेश), पी.पी. चौधरी (राजस्थान), निशिकांत दुबे (झारखंड), प्रवीण पटेल (उत्तर प्रदेश), विद्युत बरन महतो (झारखंड), लुंबाराम चौधरी (राजस्थान) आणि नरहरी अमीन (गुजरात) यांचा समावेश आहे. या खासदारांची निवड २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत संसदेत केलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे करण्यात आली आहे. चार संसदीय समित्यांचाही सन्मान खासदारांसोबतच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चार संसदीय समित्यांनाही पुरस्कृत करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी समितीचे अध्यक्ष डॉ. चरणजितसिंग चन्नी, वित्त समितीचे अध्यक्ष भर्तृहरी महताब, ग्रामीण विकास आणि पंचायती राज समितीचे अध्यक्ष सप्तगिरी शंकर उलाका, कोळसा आणि खाण समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा समावेश आहे. पुरस्काराचा इतिहास आणि निवड प्रक्रिया माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या सूचनेनुसार २०१० मध्ये ‘प्राइम पॉइंट फाऊंडेशन’ने या पुरस्काराची सुरुवात केली होती. या पुरस्काराचे प्रणेते के. श्रीनिवासन यांनी सांगितले की, “निवृत्त घटनात्मक अधिकारी आणि तज्ज्ञांची ज्युरी समिती ‘पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च’ आणि संसदेच्या सचिवालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे विजेत्यांची निवड करते.” संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा ॲड. प्रियदर्शनी राहुल यांनी माहिती दिली की, “जुलै २०२६ मध्ये नवी दिल्ली येथे १६ वा पुरस्कार सोहळा संपन्न होईल. विशेष म्हणजे, यंदा या पुरस्कारांचे १५० वे पुष्प गुंफले जाणार आहे.” नागरी समाजाच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार लोकशाही बळकट करणाऱ्या खासदारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो.
Source link
संसद रत्न 2026 पुरस्कार जाहीर:डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, स्मिता वाघ यांच्यासह पाच जणांची निवड; जुलैमध्ये दिल्लीत होणार गौरव सोहळा
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
पीएम मोदी योग | कोलकाता बोट आणि वडोदरा पूल योग; ITBP 14k फूट
31 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराआज १२ वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. यावेळी योगाचे अनेक रंग पाहायला मिळाले. जवानांनी पर्वतांवर, मुलांनी स्वीमिंग पूलमध्ये योग केला....
भानु सप्तमी पूजा: सूर्यदेव मंत्र आणि पद्धत
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराआज रविवार, 21 जून रोजी भानु सप्तमी आहे. या तिथीला भगवान सूर्याची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार रविवारचा कारक...
फिफा वर्ल्ड कप 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 वर्ल्ड कप नॉकआउट इक्वाडोर...
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 विश्वचषक नॉकआउट इक्वाडोर विरुद्ध कुराकाओ24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराचार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे...
महेश नवमी उत्सवास प्रारंभ; विविध सांस्कृतिक उपक्रमाचे केले आयोजन:महिला मंडळाच्या वतीने नृत्य अभिनय अन्...
सकल माहेश्वरी समाजाचे महेश नवमी पर्व महानगरात शुक्रवारपासून प्रारंभ झाले आहे. यास समाजाचे महिला-पुरुष उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्थानीय माहेश्वरी भवनात उत्सवात माहेश्वरी...
फिफा वर्ल्ड कप 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 वर्ल्ड कप नॉकआउट इक्वाडोर...
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026 जर्मनीने आयव्हरी कोस्टला हरवले 2 1 विश्वचषक नॉकआउट इक्वाडोर विरुद्ध कुराकाओ24 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराचार वेळा विजेत्या जर्मनीने टोरंटो येथे...
FIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: परदेशी खेळाडूंशिवाय फक्त 8 संघ | फ्रान्सकडे ९८ खेळाडू आहेतशार्लोट हरपूर/जोशुआ क्लोक. न्यू यॉर्क10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६...
डियॉर-गुच्ची देखील स्वीकारत आहेत भारतीय हस्तकला:भारतीय वस्त्रोद्योगाचे नवे पर्व; जग स्वीकारत आहे, असे करा...
भारतीय हँडलूम आता फक्त लग्न आणि सणांपुरते मर्यादित राहिलेले नाही. चंदेरी, जामदानी, इकत, कोटपद आणि कांजीवरम यांसारखे पारंपरिक वस्त्र आता ऑफिस वेअर, कॅज्युअल...
गायक गिप्पी गरेवालच्या घरावर गोळीबार:लॉरेन्स टोळीने म्हटले होते – सलमानला सांगा येऊन वाचवावे, गायकाने...
पंजाबचे लोकप्रिय गायक आणि अभिनेते रुपिंदर सिंग उर्फ गिप्पी ग्रेवाल यांच्या कॅनडा येथील घरावर 2023 साली गोळीबार झाला होता. काही काळानंतर लॉरेन्स गँगने...






























