Homeमहाराष्ट्रइंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर:गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख,...

इंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर:गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख, यंदा 70 हजार पर्यटकांची हजेरी‎

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा फटका जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पर्यटनाला बसला आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात इंधनाअभावी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. देश-विदेशातील पर्यटकांनी वेरूळकडे पाठ फिरवली आहे. दररोज सहा हजारांवर भेटी देणाऱ्या पर्यटकांची संख्या आता पाचशेवर पोहोचली आहे. नेहमी गजबजलेला लेणी परिसर सध्या पूर्णपणे ओस पडला असून, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. पुरातत्त्व विभागाकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तब्बल १ लाख पर्यटकांनी वेरूळ लेणीला भेट दिली होती. मात्र, यंदाच्या एप्रिल महिन्यात हा आकडा घसरून ७० हजारांवर आला आहे. सर्वात भीषण परिस्थिती चालू मे महिन्यात पाहायला मिळत आहे. सामान्यतः मे महिन्यात दररोज चार ते पाच हजार पर्यटक वेरूळात येत असतात. मात्र, सध्या उन्हाचा तीव्र तडाखा आहे. इंधन टंचाईने परिस्थिती आणखी बिघडली आहे. त्यामुळे हा आकडा दररोज अवघा ५०० ते ६०० पर्यटकांवर येऊन ठेपला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेल्या या जागतिक वारशासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या अवघी १० ते २० वर आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने तेल कंपनी प्रतिनिधींची बैठक घेतली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्येही पर्यटक संख्या घटलेली इंधन टंचाईमुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्येही पर्यटकांची संख्या वाढलेली नाही. छत्रपती संभाजीनगर शहरातून वेरूळकडे जाणाऱ्या परिवहन महामंडळाच्या ६० टक्के फेऱ्या डिझेलअभावी रद्द कराव्या लागल्या आहेत. खाजगी ट्रॅव्हल्स, टूर ऑपरेटर्सनीही वाहनांना डिझेल मिळत नसल्याचे चित्र आहे. डिझेल उपलब्ध नसल्याने अनेकांनी टूर केले रद्द आमच्याकडे गुजरात आणि मध्य प्रदेशातील ३ मोठ्या ग्रुपचे ॲडव्हान्स बुकिंग होते. परंतु गाड्यांसाठी डिझेल उपलब्ध नसल्याने ऐनवेळी या सर्व टूर रद्द कराव्या लागल्या. यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. – मसीउद्दीन शेख, हॉटेल व्यावसायिक व टूर ऑपरेटर, वेरूळ. मागणी तुलनेत पेट्रोल, डिझेल पुरवठाच अर्धा १० दिवसांपासून तेल कंपन्यांच्या मुख्य डेपोमधूनच ४० ते ५० टक्के कमी पुरवठा केला जात आहे. मागणीच्या तुलनेत आवक निम्मी आहे. ३ ते ४ तासांत संपूर्ण पंप रिकामा होतो. इंधन वाहून नेणाऱ्या टँकर्सच्या कमतरतेमुळे ही समस्या असल्याचे पंप चालकांनी सांगितले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NEET पेपर लीक | महाराष्ट्र, राजस्थान सीबीआयने पालकांची यादी केली

0
जयपूर/मुंबई/बंगळूरु/पाटणा25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर...

22 मे राशिभविष्य:वृषभ राशीचे लोक मालमत्तेत गुंतवणुकीची योजना बनवू शकतात, मीन राशीच्या लोकांचे उत्पन्न...

0
शुक्रवार, 22 मे रोजी मेष राशीच्या लोकांना मीडिया किंवा फोनद्वारे व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे मनासारखे परिणाम मिळतील...

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....
spot_img

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
error: Content is protected !!