आपल्या वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत असणारे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. “जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी त्याला ‘बाजीराव-मस्तानी’ने उत्तर दिले पाहिजे. जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला मी एक लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देईन,” असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मिलिंद एकबोटे यांच्या हस्ते मूर्तीचा अभिषेक आणि शंभू महापूजा करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मुस्लिम समुदायावर ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत हिंदूंना ‘बाजीराव-मस्तानी’चा मार्ग अवलंबण्याचे आवाहन केले. “जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी बाजीराव-मस्तानी केले पाहिजे. जो हिंदू मस्तानीला घरी आणेल, त्याला एक लाख रुपये रोख आणि चांदीचे कडे बक्षीस देऊ,” असे वक्तव्य मिलिंद एकबोटे यांनी केले. या विधानामुळे वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिलिंद एकबोटेंचे विवादांशी जुने नाते मिलिंद एकबोटे यांच्या विधानावरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०१८ साली झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात त्यांच्यावर दंगल भडकवणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून ते विविध कारणांनी सातत्याने चर्चेत आहेत. जर्सी गायीबद्दलचे अजब दावे पुन्हा चर्चेत नारायणगावमधील या विधानानंतर एकबोटे यांनी गेल्या वर्षी पुणे येथील कार्यक्रमात जर्सी गायीबद्दल केलेल्या विधानांचीही पुन्हा समाजमाध्यमांवर चर्चा सुरू झाली आहे. त्यावेळी त्यांनी दावा केला होता की, “जर्सी गाय हा डुक्कर आणि गाढवाच्या संयोगातून तयार झालेला प्राणी आहे. जर्सी गायीच्या दुधामुळे मधुमेह (डायबिटीज) आणि नपुंसकता येते. पुणे शहरात जर्सी गायीच्या दुधामुळेच टेस्ट ट्यूब बेबीचे कारखाने (IVF सेंटर्स) सुरू झाले आहेत आणि तिथे वेटिंग लिस्ट असते.” भारतातील देशी गायीचे महत्त्व सांगताना त्यांनी अर्जेंटिना, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांचे उदाहरण दिले होते, जिथे केवळ भारतीय वंशाच्या गाईचे दूध विकण्याची परवानगी असल्याचा दावा त्यांनी केला होता.
Source link
‘लव्ह जिहाद’ला ‘बाजीराव-मस्तानी’ने उत्तर द्या:मस्तानीला घरी आणणाऱ्या हिंदूला 1 लाखाचे बक्षीस; मिलिंद एकबोटेंचे वादग्रस्त विधान
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....
सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...
गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...
स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...
‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....
सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...































