नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कुंभमेळ्याच्या लोगोसाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धकांमधून तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक पटकावलेल्या नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या पंढरपूर येथील पीयुष पिंपळनेरकर यांचा एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे यांसारख्या दिग्गज डिझाइन तज्ज्ञांच्या समितीने या प्रवेशिकांचे परिक्षण केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली. या समितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकाद्वारे कुंभमेळा आयोजन आणि लोगो स्पर्धेबाबत माहिती दिली. यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावेळी उपस्थित साधू संतांचे स्वागत केले. नाशिक – त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाविषयी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, ‘मायगव्ह’ आणि ‘असोसिएशन ऑफ डिझाइनर्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी डिझाइन स्पर्धेतून या बोधचिन्हाची निवड करण्यात आली. २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत मायगव्ह प्लॅटफॉर्मवर पार पडलेल्या या स्पर्धेत ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले, त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. 18 ते 24 वयोगटातील तरुणांनी या स्पर्धेत सर्वाधिक सक्रिय सहभाग नोंदवला.
Source link
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण:देशव्यापी स्पर्धेतून निवड; 70 आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसह 3,067 प्रवेशिका
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -
ताज्या बातम्या
NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....
सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...
गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...
स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...
‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....
सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...































