महाराष्ट्रात आज झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांत एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच अंत झाला, तर सुदैवाने त्यांची एक वर्षाची चिमुकली यातून बचावली आहे. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर बस आणि डंपरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अन्य दोघांचा मृत्यू झाला असून, या दोन्ही घटनांमुळे राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. सातबारा येथील रहिवासी असलेले गोपाल वासुदेव खडके (वय 50) आणि त्यांची पत्नी सोनाली गोपाल खडके (वय 45) हे आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना हा अपघात झाला. प्रवासादरम्यान दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या वाहनाने समोर चालणाऱ्या ट्रॅक्टरला मागून अत्यंत भीषण धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, या पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. एक वर्षाची चिमुकली थोडक्यात बचावली या अत्यंत भीषण घटनेत एक सुखद धक्का देणारी बाब म्हणजे, या दाम्पत्यासोबत असलेली त्यांची एक वर्षाची चिमुकली मुलगी या अपघातातून सुदैवाने सुरक्षित बचावली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. एका क्षणात आई-वडिलांचे छत्र हरवल्याने चिमुकल्या मुलीवर आणि खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी गावाजवळ एसटी बस आणि मुरुमाने भरलेल्या डंपरमध्ये झालेल्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अक्कलकोटहून गाणगापूरकडे जाणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या डंपरने इतकी जोरदार धडक दिली की, या भीषण आघातानंतर डंपरने जागीच पेट घेतला. या दुर्दैवी घटनेत अक्कलकोट तालुक्यातील 18 वर्षीय तरुणी चंद्रभागा लाडप्पा हडपद आणि धाराशिव जिल्ह्यातील 76 वर्षीय वृद्ध चांगदेव श्रीरंग लवटे यांचा अंत झाला आहे. या अपघातात एसटी बसच्या समोरच्या भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवले. दरम्यान, मृत प्रवाशांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Source link
काळजाचा थरकाप!:जामनेरमध्ये पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली; तर अक्कलकोटमध्ये एसटी-डंपरच्या धडकेत दोघांचा अंत
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
























