Homeमहाराष्ट्रनसरापूर प्रकरण:चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून पुणे-बेंगळूर महामार्ग रोखला; न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही;...

नसरापूर प्रकरण:चिमुकलीचा मृतदेह रस्त्यावर ठेवून पुणे-बेंगळूर महामार्ग रोखला; न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही; नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा

भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेचे पडसाद आज पुण्यात उमटले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईक आणि नागरिकांनी पुण्यातील नवले पुलावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करत महामार्ग पूर्णतः रोखून धरला. या आंदोलनामुळे पुणे-बेंगळूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मैलोन्मैल रांगा लागल्या असून, परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी नसरापूर येथे एका ६५ वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची हत्या केली. या घटनेमुळे राज्यभर संतापाची लाट आहे. आज या चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी तो थेट पुण्यातील नवले पुलावर आणून रास्ता रोको केला. “जोपर्यंत या नराधमाला कठोर शिक्षा होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि चिमुरडीवर अंत्यसंस्कारही करणार नाही,” अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. गुन्हे दाखल करा, पण आम्ही हटणार नाही आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. “आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा, पण आमच्या लेकीला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही रस्ता मोकळा करणार नाही,” असा पवित्रा महिला आणि ग्रामस्थांनी घेतल्यामुळे पोलिसांचीही कोंडी झाली आहे. महामार्ग पूर्णतः ठप्प; वाहनांच्या रांगाच रांगा नवले पुलावर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे पुणे-बेंगळूर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. शनिवारची सुटी असल्याने महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती, मात्र आंदोलनामुळे आता तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवाही या वाहतूक कोंडीत अडकल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नेमकी घटना काय? भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहणाऱ्या भीमराव कांबळे (वय ६५) या नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला ‘वासरू दाखवतो’ असे आमिष दाखवून गुरांच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अनन्वित अत्याचार करून या नराधमाने दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने चिमुकलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या क्रूर कृत्याची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुदैवी आणि संतापजनक आहे.या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे. बालिकेच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही आयोगाचे अध्यक्ष यांनी केले आहे. बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Gemini Financial Gain & Capricorn Promotion 2026

0
9 तासांपूर्वीकॉपी लिंकसोमवार, 2 नोव्हेंबर रोजी मिथुन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नतीची शक्यता आहे आणि दीर्घकाळापासून रखडलेले पैसेही परत मिळू शकतात. मकर राशीच्या...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!