Homeपुणे / पिंपरी-चिंचवडवाहनफेरीमध्ये घुमला हिंदुराष्ट्राचा जयघोष ! 

वाहनफेरीमध्ये घुमला हिंदुराष्ट्राचा जयघोष ! 

हिंदु राष्ट्र जागृती सभेच्या प्रसारासाठी हडपसर (पुणे) येथे भव्य वाहनफेरी !
      हडपसर (पुणे) – हडपसर येथे आयोजित हिंदु राष्ट्रजागृती सभेचे रणशिंग फुंकण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य वाहनफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दुचाकींवरील फडकत असलेले भगवे ध्वज, पारंपारिक वेशभूषेतील स्वाभिमानी हिंदुत्वनिष्ठ आणि ‘हिंदू ऐक्य’ अन् ‘हिंदुत्वाचा’ गौरव करणाऱ्या घोषणांनी संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. मार्गावर ठिकठिकाणी झालेली पुष्पवृष्टी आणि धर्मप्रेमींचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर पूर्णपणे हिंदुत्वमय झाला होता. प्रारंभी जय शंकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विप्र शिरोमणी श्री. सु.द. उपाख्य पप्पाजी पुराणिक यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करून फेरी प्रारंभ झाली. या वेळी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये आणि सनातनच्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक, यांच्या वंदनीय उपस्थितीसह हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. तीन ठिकाणी वाहन फेरी आणि धर्मध्वजाचे स्वागत झाले. हिंदुत्वनिष्ठ हनुमंत गावडे, पुण्याचे नगरसेवक नितीन गावडे, फुरसुंगी उरळी देवाची येथील नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. मोनिका निलेश पवार यांनी धर्मध्वजाचे स्वागत केले.एका ठिकाणी फटाके वाजवून वाहन फेरीचे स्वागत करण्यात आले. हडपसर येथील धर्मसभेला संबोधित करणारे वक्तांचे कट आउट वाहन फेरीमध्ये सहभागी झालेल्या धर्माभिमान्यांनी हातात घेतले होते. हिंदू राष्ट्र जागृती सभेची माहिती सांगणारी चलचित्रफीत चालू असलेला टेम्पो वाहन फेरीमध्ये सहभागी झाला होता.
    फेरीचा प्रारंभ येथील भेकराईनगर PMT बस डेपोपासून दुपारी 5.00 ला झाला. पापडेवस्ती, काळेपडळ, ससाणेनगर, पुरोहित स्वीट चौक, काळेपडळ मार्गाने निघालेल्या फेरीचा समारोप कै. मारुतराव काळे विद्यालयाचे मैदान येथे सांगता सभेने झाला. या वेळी ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण करूया, हिंदू राष्ट्रासाठी कृतीशील होऊया’, ‘मनामनात श्रीराम, प्रत्येक श्वासात श्रीराम’, ‘धर्मशिक्षण हाच खरा धर्मरक्षणाचा उपाय’ यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या.
200 हून अधिक धर्माभिमानी 100 हून अधिक वाहने वाहन फेरीमध्ये सहभागी झाले होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.
      समारोपप्रसंगी फेरीचे सभेत रूपांतर झाले. आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प अधिक दृढ करण्यासाठी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 5 एप्रिल या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, काळेपडळ, हडपसर येथील मैदानात हिंदु राष्ट्रजागृती सभा होणार आहे. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, भाग्यनगर येथील ‘श्रीराम युवा सेने’चे संस्थापक-अध्यक्ष आमदार टी. राजासिंह आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र छत्तीसगढ राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे सभेत संबोधित करणार आहेत. ‘हिंदु राष्ट्र’ हे केवळ स्वप्न नसून ते ध्येय मानून, आगामी धर्मजागृती सभेत हिंदूंच्या वज्रमुठीची ताकद दाखवण्यासाठी सर्वांनी बहुसंख्येने या सभेला एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!