Homeमहाराष्ट्रपुण्याच्या खराडीत 200 कोटींचा घोटाळा:95 टक्के रक्कम भरूनही दोन वर्षांपासून घराचा ताबा...

पुण्याच्या खराडीत 200 कोटींचा घोटाळा:95 टक्के रक्कम भरूनही दोन वर्षांपासून घराचा ताबा नाही, नागरिकांचे आंदोलन

खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक सदनिकाधारकांनी बुधवारी आपल्या हक्काच्या घरासाठी धरणे आंदोलन केले. 95 टक्के रक्कम भरूनही गेल्या दोन वर्षांपासून घरांचा ताबा मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकल्पात तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, जर दहा दिवसांत घराचा ताबा मिळाला नाही, तर आत्मदहन किंवा इमारतीवरून उडी मारण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल. सदनिकाधारकांच्या म्हणण्यानुसार, बिल्डरने घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार 95 टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल केली. मात्र, मुदत उलटून दोन वर्षे झाली तरी प्रकल्प अपूर्णच आहे. सुमारे 130 रहिवाशांनी प्रत्येकी 1.40 कोटी रुपये याप्रमाणे 200 कोटींपेक्षा अधिक रक्कम भरली असूनही प्रकल्पात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही. या प्रकरणी महारेरा आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उलट पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचा दावाही करण्यात आला. हा केवळ निष्काळजीपणा नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आंदोलनस्थळी आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट देऊन रहिवाशांशी संवाद साधला. त्यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, रहिवाशांनी आर्थिक आणि मानसिक तणावाचा मुद्दा अधोरेखित केला. घराचे कर्ज फेडणे आणि भाड्याने राहण्याचा दुहेरी खर्च सहन करावा लागत असल्याने अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहेत. काहींना आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या आहेत. बिल्डरने प्रकल्प गहाण ठेवून सुमारे 450 कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कारवाई करून त्यांना परदेशात जाण्यापासून रोखावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच राज्य सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...

0
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व

0
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.         ...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
spot_img

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...

‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !

0
  गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...

Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians

0
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...

हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...

0
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...
error: Content is protected !!