राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या संविधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पक्षाचा कणा मानले जाणारे ओबीसी, अल्पसंख्याक आणि सामाजिक सेल नव्या रचनेतून वगळण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी पक्षाच्या संविधानात सात फ्रंटल सेलचा समावेश होता, मात्र आता केवळ चारच सेल ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या बदलांमुळे पक्षाच्या संघटनात्मक धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्या संविधानात युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या चारच सेलचा समावेश करण्यात आल्याचे समोर आले आहे. 28 फेब्रुवारी रोजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या वेळी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये या बदलांचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या बदलांची अधिकृत नोंद झाली असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अंतर्गत निर्णयप्रक्रियेवरही चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी अध्यक्षांच्या अधिकारांचे हस्तांतरण कार्याध्यक्षांकडे करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचेही त्यांनी नमूद केले. निवडणूक आयोगाला पत्र रोहित पवार यांनी मांडलेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी रोजी प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या स्वाक्षऱ्यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आले होते. या पत्रात अध्यक्षांच्या निधनानंतर कार्याध्यक्षांकडे पूर्ण अधिकार असल्याचे नमूद करण्यात आले होते. या निर्णयात संबंधितांना न कळवता घाईघाईत कारवाई केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र दरम्यान, दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही निवडणूक आयोगाला स्वतंत्र पत्र दिले आहे. 28 जानेवारी ते 10 मार्च 2026 या कालावधीत पक्षाच्या वतीने इतर कुणी केलेला पत्रव्यवहार अमान्य करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाने आणखी गुंतागुंत वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Source link
राष्ट्रवादीत मोठा बदल; ओबीसी-अल्पसंख्याक सेल गायब:नव्या रचनेवर गंभीर प्रश्न;संविधान बदलांवरून रोहित पवारांची टीका
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























