“राजकारण हा माझा पिंड नाही, माझा मूळ स्वभाव हा कलाकाराचाच आहे. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही माझे इतके उत्तम वर्णन केले, मला इतके जवळून ओळखले, मग ‘ऐसी कौनसी बात थी, की और किसी का हाथ पकडना पडा’,” अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शायरीला ‘शायरी’नेच उत्तर दिले. विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित निरोप समारंभात उद्धव ठाकरे यांची फटकेबाजी आणि राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणाले, मी या विधीमंडळात मुख्यमंत्री म्हणून आलो होतो. काही गोष्टी आयुष्यात अशा घडतात की आपल्या ध्यानीमनी नसते आणि अचानक ती जबाबदारी येते. जबाबदारी आल्यानंतर त्यातून पळ काढणे हे मर्दाचे लक्षण नसते. त्यामुळे ती जबाबदारी स्वीकारली. मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. सर्व माझे त्यावेळचे आजी-माजी सहकारी, मंत्रिमंडळात होते. सगळे शासकीय अधिकारी, सर्व प्रशासन, सर्व अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. कारण एक प्रशासनाचा गंधही नसणारा माणूस अचानक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसतो आणि तो राज्य चालवतोय. हे या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य झाले नसते. उद्धव ठाकरेंना आठवला ‘तो’ दिवस उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय आपण मला निरोप देण्यासाठी स्वत: अगत्याने हजर राहिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला तो ही दिवस आठवला आणि त्या दिवसाची आठवण मी तुम्हाला करून देणार आहे. पण काल विधिमंडळात जे काही घडले ते बघून मला तो दिवस का आठवला ते सांगतो. कारण आपण म्हणाला होतात ज्ञानेश्वरांचे भारूड. काट्याच्या आणीवर वसली तीन गावे, दोन ओसाड एक वसई चिना, आता त्या गावची पाटीलकी आपल्याकडे आहे. आता ते आणीवरच्या तीन गावांमधील एक गाव आणीवर गेलेले आहे. बाकी गावांचे काय झाले? ते त्या गावकऱ्यांना माहिती आहे. आताच्या शतकात स्वार्थासाठी रेडे कापले जातात उद्धव ठाकरे म्हणाले, ज्ञानेश्वरांची आठवण आल्यानंतर एक गोष्ट आवर्जुन सांगावी वाटते की, ज्ञानेश्वर महाराज १२ व्या, १३ व्या शतकात होऊन गेलेले आहेत. त्यावेळेला ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले होते. त्या शतकापासून या शतकात आल्यानंतर स्वार्थासाठी रेडे कापले जातात. हा महाराष्ट्र कोणत्या दिशेने चाललेला आहे? आपले खालच्या सभागृहातील निवेदन मी काळजीपूर्वक ऐकले. नाशिकच्या प्रकरणाबाबत आपण जी भूमिका घेतली, त्यासाठी धन्यवाद देतो. देशात बुवा नाही, तर युवा चमत्कार करू शकतात उद्धव ठाकरे म्हणाले, सिनेकलावंत अतुल कुलकर्णी यांचे एक चांगले वक्तव्य आहे. पकडले जातात ते भोंदू, पण जे पकडले जात नाहीत त्या महाराजांचे काय करायचे? आपण सगळ्यांनी एकत्र मिळून एक भूमिका घ्यायला पाहिजे. सगळ्या राजकारणींनी ठरवले, तर बुवा शक्ती पेक्ष युवाशक्तीला आपण जास्त ताकद दिली पाहिजे. या देशात बुवा चमत्कार करू शकत नाही, युवा चमत्कार करू शकतात. युवाशक्तीला नीट पाठिंबा दिला, तर या बुवांची दुकाने बंद झाल्याशिवाय राहणार नाही.
Source link
मला दुसऱ्याचा हात धरावा लागला असे काय होतेः उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘कविता’ सवाल
- Advertisment -
- Advertisment -
ताज्या बातम्या
स्वतःची पुस्तके ते 42 खजिना बाल वाचनालय:मुंबईच्या शरयू देसाई यांचा मुलांच्या स्वप्नांना पंख देणारा...
आजच्या डिजिटल माध्यमाच्या युगात मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही सामान्य गोष्ट झालीय. कोणी सोशल मीडियावर रील्स पाहतं, तर कोणी स्वतःच कंटेंट क्रिएटर बनतं....
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
वसुबारस (गोवत्स द्वादशी) चे महत्त्व
वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया.
...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
‘सनातन संस्थे’च्या साधकांच्या बेकायदेशीरपणे चौकशा चालूच !
गेल्या काही दिवसांपासून सनातन संस्थेचे साधक, हितचिंतक आणि जाहिरातदार यांच्या बेकायदेशीरपणे पोलीस चौकशा होत असल्याचे लक्षात आले आहे. पोलीस, पोलीस पाटील, सायबर शाखा आणि...
Karwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians
Marathi NewsLifestyleKarwa Chauth 2026 Celebration Photos; Bollywood Politicians | Anushka Virat Kohli Shivraj Chouhan Sadhnaलेखक: अदिती ओझा10 तासांपूर्वीकॉपी लिंककरवा चौथचा सण. हातात चाळणी,...
हिंदु जनजागृती समितीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण; पुणे येथे घेतली ‘हिंदु राष्ट्र-स्थापने’ची प्रतिज्ञा...
पुणे - घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर हिंदु जनजागृती समितीने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्षात पदार्पण केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयाने प्रेरित...

























